Goa Tiger project : व्याघ्र प्रकल्पाचा कडवळ, वायंगिणीला फटका

कोर झोनमध्ये समाविष्ट : बफर झोनमधील 28 गावांनाही बसणार झळ, सत्तरी तालुक्यात अस्वस्थता
Tiger Project
Tiger ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tiger Project: म्हादई अभयारण्य व आसपासच्या परिसरात व्याघ्र प्रकल्प झाल्यास सत्तरी तालुक्यातील तीस गावे प्रभावित होणार आहेत. यापैकी नगरगाव पंचायत क्षेत्रातील वायंगिणी व सावर्डे पंचायत क्षेत्रातील कडवळ ही दोन गावे कोर झोनमध्ये मोडतात. कडवळ गावात गावकर कुटुंबीयांची दोन घरांची वस्ती असून वायंगिणी गावात चार घरे आहेत.

Tiger Project
Vishal Golatkar Murder Case: संशयित अमेय वळवईकरच्या, जामीन अर्जावर उद्या सुनावणी

येथील अनेक कुटुंबे मुलांचे शिक्षण, नोकरी आदी कारणाने अन्यत्र स्थलांतरित झाली आहेत. परंतु त्यांच्या काजू बागायती व अन्य उत्पन्न येथे असल्याने हंगामात हे लोक गावात येतात व पीक घेतात. या गावांचा तसेच तेथील उत्पादनाचा विचार होणे आवश्‍यक आहे.

सुमारे २८ गावे बफर कक्षेत येतात. वाघांचा अधिक अधिवास असलेल्या कोर झोनमधील गावांना याचा प्रामुख्याने फटका बसणार आहे. या गावांचा विचार सरकारला सर्वात आधी करावा लागणार आहे. कोर झोनमध्ये मोडणाऱ्या दोन गावातील लोकांना स्थलांतरित करावे लागणार आहे. व्याघ्र प्रकल्प सध्या सत्तरीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न बनलेला आहे.

म्हादई अभयारण्यानंतर आता व्याघ्र प्रकल्पाचे संकट घोंघावत असल्याने लोक अस्वस्थ आहेत. लोक वस्ती, मंदिरे, घरे, रस्ते, बागायती, शेती आदी वगळूनच व्याघ्र क्षेत्र करावे असा सूर काहीजण व्यक्त करीत असले तरी अनेकजण सत्तरीत व्याघ्र प्रकल्प नकोच यावर ठाम आहेत. नगरगावच्या ग्रामसभेत लोकांनी तशी मागणी लावू्न धरली होती.

२४ जुलै रोजी उच्च न्यायालयाने येत्या तीन महिन्यांत व्याघ्र प्रकल्पावर कार्यवाही सुरू करावी असा आदेश दिला आहे, त्यामुळे सत्तरीवासीय प्रचंड धास्तावले आहेत. १९९९ साली म्हादई अभयारण्य घोषित आल्यानंतर आता व्याघ्र प्रकल्प अस्तित्वाचा प्रश्‍न बनला आहे. डोंगुर्ली ठाणे, सावर्डे, खोतोडे, नगरगाव, म्हाऊस, मोर्ले, केरी या सात पंचायत क्षेत्रातील तीस गावे यामुळे प्रभावित होणार आहेत.

कोर झोन व बफर झोन म्हणजे काय?

कोर झोन ज्या भागात पट्टेरी वाघांचा जास्त प्रमाणात वावर आहे असा भाग व बफर झोन म्हणजे जिथे वाघांचा संचार फिरता व मोठी लोक वस्ती असलेला असा भाग होय

कडवळ, वायंगिणी ही गावे कोर झोनमध्ये येत असल्याने या गावांना झळ बसणार आहे. या गावातील लोकांचे वनहक्काचे अनेक दावे प्रलंबित आहेत. तसेच अनेकांची बागायती याभागात आहेत. व्याघ्र प्रकल्पातून हे क्षेत्र वगळले जाणार का, याबाबत प्रश्‍न आहे. सत्तरीत सुमारे २,४८२ वनहक्क दावे सादर झाले आहेत, मात्र अजूनही अनेकांना न्याय मिळालेला नाही. आता म्हादई क्षेत्रात व्याघ्र प्रकल्प लादल्यास लोकांना जमिनीचे हक्क मिळणार नाहीत. वन खाते आता अस्तित्वाचे पुरावे मागत आहे. वाघांचे संवर्धन होण्यासाठी व्याघ्र प्रकल्प राबवला जात आहे, परंतु ग्रामीण लोकांच्या संवर्धनाचे काय, याचाही विचार व्हायला हवा.

Tiger Project
पोलीस दलात भरती होणार होता, पण विशालच्या हत्येमुळे पोहोचला तुरुंगात; आता जामिनासाठी धडपड

अॅड. गणपत गावकर, सामाजिक कार्यकर्ता, वाळपई, सत्तरी

कडवळच्या आव्हानात्मक जागेत घरात वास्तव्य करुन आहोत. वीजेची सोय पोहचलेली नाही. सोलार बँटरीचा लाभ हा बेभरवंशाचा असतो.परिणामी मेणबत्ती, लाकडांची उर्जा यांच्या उजेडात रात्रीच्या वेळी गुजराण करावी लागते. दीराच्या मुलांना शाळेत दररोज कडवळ गावातून पायी प्रवास करणे शक्य नसते, त्यामुळे शेजारील कुमठळ गावात ते रहातात. अभयारण्यामुळे कडवळला जोडणारा रस्ता झालेला नाही. जंगलासंबंधी कोणताही प्रकल्प राबवताना जंगलात राहणाऱ्या लोकांचाही विचार आधी व्हायला हवा.

- अश्विनी गावकर, कडवळ, सत्तरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com