पोलीस दलात भरती होणार होता, पण विशालच्या हत्येमुळे पोहोचला तुरुंगात; आता जामिनासाठी धडपड

अमेय वळवईकर हल्लीच गेल्या मार्चमध्ये नव्याने पोलिस खात्यात भरती झाला होता
Vishal Golatkar Murder Case
Vishal Golatkar Murder Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Gangwar Vishal Golatkar Murder Case

गोव्याला हादरवून सोडणाऱ्या विशाल गोलतकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमेय वळवईकर (वय २५) याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अमितच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला असून न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vishal Golatkar Murder Case
Panjim Smart City: प्रतीक्षा ‘स्‍मार्ट सिटी’ची; मात्र मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष

अमेय वळवईकर हा गेल्या वर्षी मार्चमध्ये पोलीस खात्यात भरती झाला होता. वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्याचे प्रशिक्षण सुरू होते. अमेय हा मुख्य आरोपी कुंडईकरचा नातेवाईक आहे. ज्यावेळी विशाल गोलतकर याच्यावर हल्ला झाला तेव्हा अमेयसुद्धा कुंडईकरसोबत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती. सध्या अमेय न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

एकाच टोळीतील साथीदार एकमेकांचे शत्रू का झाले?

पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरशीतील गुंड साई ऊर्फ कोब्रा आणि विशाल हे दोघे पूर्वी एकाच गुन्हेगारी गटात होते.

नंतर त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. विशाल साईचा तिरस्कार करू लागला. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट वाढत गेले. नंतर साईने विशालचा काटा काढण्याचे ठरवले.

त्यासाठी त्याने रात्री व्यवस्थित नियोजन केले आणि मेरशी येथे एका ठिकाणी विशालला बोलावून घेतले. त्यावेळी त्याने आपल्यासोबत ओमकार पांडुरंग च्यारी (१९), गौरेश नारायण गावस (२५) तुषार तुळशीदास कुंडईकर (३८) यांच्यासह एका अल्पवयीनाला सोबत घेऊन विशालवर धारदार शस्त्राने हल्ला केला. विशालचा खून केल्यानंतर त्यांनी तेथून दीड किलोमीटर वयलेभाट - मेरशी येथील मिनेझिस फॅक्टरीजवळच्या झुडपात त्याचा मृतदेह टाकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com