Datta Naik Case: पुण्‍याला जाण्‍यास दत्ता नायक यांना न्‍यायालयाची परवानगी; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Court Approval For Datt Naik’s Travel Request To Pune: पुण्‍याला जाण्‍यासाठी न्‍यायालयाने आपल्‍याला परवानगी द्यावी, या मागणीसाठी विचारवंत तथा साहित्‍यिक दत्ता नायक यांनी न्‍यायालयाकडे अर्ज केला हाेता.
Datta Naik Case
Datta Damodar Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पुण्‍याला जाण्‍यासाठी न्‍यायालयाने आपल्‍याला परवानगी द्यावी, या मागणीसाठी विचारवंत तथा साहित्‍यिक दत्ता नायक यांनी न्‍यायालयाकडे अर्ज केला हाेता. मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायाधीश वाल्‍मिकी मिनेझिस यांनी आज यासाठी परवानगी मंजूर केली.

धार्मिक भावना दुखावल्‍याच्‍या आरोपाखाली दत्ता नायक यांच्‍या विरोधात काणकोण पोलिसात गुन्‍हा नाेंद झाल्‍यानंतर नायक यांनी अटकपूर्व जामिनासाठी मडगावच्‍या सत्र न्‍यायालयात केलेला अर्ज अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांनी सशर्त मान्य केला होता. त्‍यावेळी राज्‍याबाहेर जायचे असल्‍यास आगाऊ परवानगी घ्‍यावी, अशी अट नायक यांना घातली होती.

Datta Naik Case
Datta Naik Case: दत्ता नायक यांना मोठा दिलासा! आक्षेपार्ह धार्मिक विधान प्रकरणात अखेर सशर्त जामीन

नायक यांना पुण्‍यातील (Pune) साधना या मासिकाला एक मुलाखत देण्‍यासाठी १६ जानेवारी रोजी पुण्‍यात जाणे आवश्‍‍यक होते. त्‍यासाठी न्‍यायालयाने परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज नायक यांनी दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयात काल दाखल केला होता. मात्र, सत्र न्‍यायालयाने या अर्जावरील सुनावणी २१ रोजी ठेवल्‍याने नायक यांनी उच्‍च न्‍यायालयात अर्ज केला. आज सकाळी त्‍यांनी केलेला हा अर्ज न्‍यायालयाने मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com