Ponda Theft: चोरट्यांचा दागिने आणि रोकड घेऊन पोबारा; कुर्टी-फोंडा येथील घटना

Curti Ponda: एक लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज लंपास
Curti Ponda: एक लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज लंपास
Ponda TheftDainik Gomantak

कुर्टी-फोंड्यातील प्रभूनगर भागात राहणाऱ्या वासीम सांखलीपूर याच्या घरात काल मध्यरात्री चोरी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन पोबारा केला. फोंडा पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.

वासीम साखलीपूर याच्या कुटुंबातील सदस्य रविवारी रात्री बारानंतर झोपी गेल्यानंतरच चोरीची घटना घडली. रविवारी रात्री कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा उठवत चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी घराच्या मागील भागाकडील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला व आतील कपाटे उघडून त्यातील तीन सोन्याच्या अंगठ्या तसेच रोख पंधरा हजार रुपये मिळून एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

सकाळी सांखलीपूर कुटुंब उठल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. लक्षात येताच त्यांनी फोंडा पोलिसांना चोरीसंदर्भात कळविले. या चोरीत एकापेक्षा जास्तपण सहभागी असावेत, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

Curti Ponda: एक लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज लंपास
Goa Theft: पर्यटक म्हणून आले,गाडी घेऊन पळाले!

पोलिसांची गस्त हवी

या घटनेनंतर प्रभागाचे पंचसदस्य नीळकंठ नाईक म्हणाले की, पोलिसांनी रात्रीच्यावेळी या भागात गस्त घालावी. या भागात सध्या भाडेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाडेकरूंची पडताळणी व्हायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com