गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर चोरट्यांचा सुळसुळाट

तक्रारींमध्ये वाढ : पर्यटन पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्‍नचिन्ह
Goa Beach
Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असून विविध समुद्रकिनाऱ्यांवर त्याची गर्दी आहे. समुद्रात स्नान करण्यासाठी जाताना किनाऱ्यावर ठेवलेले कपडे व वस्तू चोरण्याचे प्रकार सर्रास घडत असून त्याच्या तक्रारीही पोलिस स्थानकात दाखल होत आहेत. किनाऱ्यावर नियुक्त करण्यात आलेल्या पर्यटन पोलिसांची नजर व दक्षता नसल्याने चोरट्यांचे आयतेच फावले आहे. जिवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मात्र त्यांच्या किंमती वस्तूंना मुकावे लागल्याने पस्तावण्याची पाळी येत आहे.

समुद्रकिनाऱ्यावर फेरीवाले तसेच मसाज करणाऱ्या परप्रांतीय महिलांना बंदी असूनही ते सर्रासपणे हा व्यवसाय करताना दिसतात. फिरते विक्रेतेही पर्यटकांना वस्तू खरेदी करण्यासाठी सतावणूक करतात. गोव्यात आलेले पर्यटक किनारा पाहून बेभान होऊन स्नानासाठी समुद्रात उतरतात. त्यांच्या बॅगा तसेच कपडे किनाऱ्यावर ठेवून ते पाण्यात जातात. किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने समुद्रात उतरलेल्यांची नजर चुकवून बॅगा, पळवण्याचे प्रकार घडत आहेत. काळोख होईपर्यंतही काही पर्यटक समुद्रातच मजा घेत असतात त्यामुळे अंधाराचा फायदा घेत हे चोरटे वस्तू हातोहात लंपास होण्याच्या घटना बागा, वागातोर व कळंगुट किनाऱ्यावर घडल्या आहेत.

Goa Beach
मॉन्सूनची कारवारपर्यंत आगेकूच; दोन दिवस राज्यात पाऊसच नाही

पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज !

किनाऱ्यावर काही आयआरबी पोलिसांना पर्यटन पोलिस म्हणून नेमले होते. मात्र हे पोलिस किनाऱ्यावर क्वचितच दिसतात. शिवाय या पोलिसांची संख्या खूपच कमी असल्याने किनाऱ्यावर लक्ष ठेवणे त्यांना कठीण आहे.

पर्यटक पाठपुरावा करत नाहीत !

समुद्रकिनाऱ्यावर चोरी झाल्याची तक्रार पर्यटक पोलिस स्थानकात देण्यासाठी धाव घेतात. मात्र गोव्यातून निघून गेल्यावर पर्यटक त्याचा पाठपुरावा करत नाहीत. पोलिसही नंतर तपास बंद करण्याचा निर्णय घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cutbona jetty sanitation issues Goa
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com