आधी देवदर्शन, मग तिजोरीवर डल्ला

चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामद्धे कैद
Vasco Temple CCTV Footage
Vasco Temple CCTV Footage Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सडा-वास्को येथील खापरेश्वर मंदिरात मंगळवारी सकाळी चोरी झाली. चोराने पहाटे 3:15 च्या सुमारास मंदीरात जाऊन आधी प्रार्थना केली आणि नंतर दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली.

Vasco Temple CCTV Footage
खरी कुजबूज! ...मोन्सेरात यांची धाकधूक

ही पूर्ण घटना मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामद्धे कैद झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामद्धे रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओनुसार,
चोराने लोखंडी रॉडच्या मदतीने मंदिराचे (Temple) मुख्य गेट तोडले. पुढे त्याने मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. गाभाऱ्यात जाऊन आधी चोराने देवाला नमस्कार केला आणि नंतर लोखंडी रॉडने दानपेटी फोडून त्यातील पैसे लंपास केले.

Vasco Temple CCTV Footage
आतापर्यंत गोव्यातील राजकीय पक्षांनी जनतेचा अपेक्षाभंगच केला!

खापरेश्‍वर मंदिरातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दानपेटीत सुमारे 30,000 रुपये होते तर मालमत्तेचे सुमारे 70,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. मंदिर समितीने मुरगाव पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com