Ponda Municipal Election 2023: प्रभाग 5 मधील 'ही' अपूर्ण कामे विकास कामात ठरताहेत अडथळा

आरक्षणामुळे बदलणार समीकरणे ; उमेदवारांकडून विजयासाठी तयारी सुरू
Ponda
PondaDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Municipal Election 2023: प्रभाग क्रमांक पाच हा फोंडा शहरातील एक ''पॉश'' प्रभाग. खडपाबांधचा काही भाग, तिस्का चा काही भाग, दागचा काही भाग असे एकत्र होऊन प्रभाग पाच बनला आहे. फोंड्याची प्रसिद्ध गुलमोहर सोसायटी, रवी नगर, दाग येथील सरस्वती देऊळ, सरकारी कार्यालयाचे संकुल, यांचा या प्रभागात समावेश केला गेला आहे.

रवी नगर भागात तर रांगेने बंगले दिसतात. फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे निवासस्थानही याच प्रभागात येते. पण या प्रभागाची गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे मलनिस्सारण प्रकल्पाची रेंगळालेली कामे. यामुळे विकासात अडथळे येत गेले.

तिस्काहून खडपाबांधकडे जाणाऱ्या वाटेवर मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू असलेले दिसते. व्यंकटेश नाईक हे या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक आहेत. माजी नगराध्यक्ष असलेल्या नाईक यांनी ‘हॅट्‍ट्रीक’ साधली आहे.

‘हॅट्‍ट्रीक’ साधणारे ते फोंडा पालिकेच्या इतिहासातील दुसरे नगरसेवक. यापूर्वी हा विक्रम माजी उपनगराध्यक्ष महादेव खानोलकर यांच्या नावावर आहे. नाईक हे खरे तर प्रभाग चार चे नगरसेवक. तिथून ते सलग दोनदा विजयी झाले.

Ponda
CM Pramod Sawant: अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवली 169.53 कोटींची संपत्ती; मुख्यमंत्र्यांची माहिती

मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामामुळे बरेच अडथळे निर्माण झाले आहेत.या कामामुळे काही रस्त्यांचे हॉट मिक्स डांबरीकरणसुद्धा करता आलेले नाही. इथे सरकारी कार्यालयाचे संकुल असल्याने येथे कामासाठी येणाऱ्यांची नेहमीच गर्दी असते.

मुख्य रस्त्यावरच मलनिस्सारणकरता खड्डे खणल्यामुळे वाहतुकीत बाधा आली होती. प्रभागाच्या पाच वर्षाच्या विकासात मलनिस्सारण प्रकल्प अधोरेखित होतो,असे व्यंकटेश नाईक म्हणाले.

Ponda
CM Pramod Sawant: आंबेडकर जयंती राज्य सोहळा म्हणून साजरी करणार; पर्वरीत पुढील वर्षात आंबेडकर भवन

व्यंकटेश यांची ‘घरवापसी’, तर रितेशसाठी ‘होम ग्राऊंड’

गेल्या खेपेला प्रभाग 4 महिलांकरता आरक्षित झाल्याने व्यंकटेश नाईक यांना बस्तान प्रभाग पाच मध्ये हलवावे लागेल. आणि प्रभाग बदलूनही त्यांनी प्रभाग पाचच्या तत्कालीन नगरसेविका लालन नाईक यांना हरवून तिसऱ्यांदा विजयश्री प्राप्त केली.

पण आता प्रभाग 4 खुला झाल्यामुळे ते ‘घर वापसी’ करणार असून तिथून निवडणूक लढवणार आहेत. दुसऱ्या बाजूला विद्यमान नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांचा प्रभाग क्रमांक 11 महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे ते प्रभाग 5 मधून रिंगणात उतरणार आहेत.

हा प्रभाग त्यांचा ‘होम ग्राउंड’ समजला जातो. पण त्यामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे रवी नाईक यांना आघाडी प्राप्त झाली होती .

Ponda
Cashew Festival Goa 2023: 15 पासून पणजीत काजू महोत्सवाचे आयोजन

आरक्षणामुळे मर्यादा, तरीही चुरस

या खेपेला प्रभाग क्रमांक पाच इतर मागासवर्गीय करता आरक्षित झाला असला तरी सर्वांचे लक्ष या प्रभागावर लागून राहिले आहे.

याचे प्रमुख कारण म्हणजे या प्रभागातून यावेळी विद्यमान नगराध्यक्ष रितेश रवी नाईक हे रिंगणात उतरणार असून त्यांना ‘रायझिंग फोंडा’ तर्फे उतरणाऱ्या सुशांत कवळेकरशी सामना करावा लागणार आहे.

तिसरा कोन अजून स्पष्ट झालेला नाही. या प्रभागात हजाराच्या वर मतदार असून त्यातील बहुतेक मतदार हे सुजाण श्रेणीत मोडतात. त्यामुळे उमेदवाराचा कस लागणार हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com