PFI सोबत संपर्काच्या संशयावरून माजी नगराध्यक्ष सैफुल्ला खानसह इतरांना ताब्यात घेऊन नंतर सुटका

वास्को, मुरगाव, दाबोळी येथील काहींना ताब्यात घेऊन नंतर वैयक्तिक हमीवर सोडण्यात आले.
PFI
PFIDainik Gomantak
Published on
Updated on

देशात दहशतवादीना आर्थिक सहकार्य करीत असल्याच्या संशयावरून विविध राज्यात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India) सदस्यांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेऊन अटक करण्याचे सत्र सुरु केले आहे. दरम्यान वास्को पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेची संपर्क असल्याच्या संशयावरून मुरगाव नगर पालीकेचे माजी नगराध्यक्ष तथा माजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सैफुल्ला खान, उद्योजक सय्यद रियाज कादरी, उद्योजक नियाजी शेख, अमीनिद्दीन मुल्ला, इमरान शेख, मोहम्मद साजिद शेख व मुसा शेख यांना ताब्यात घेऊन नंतर वैयक्तिक हमीवर सोडण्यात आले.

PFI
Margao Muncipality: गुप्त मतदानाद्वारेच होणार मडगाव नगराध्यक्ष निवड

वास्को पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India) संपर्कात असल्याच्या संशयावरून वास्को, मुरगाव, दाबोळी (Vasco, Murmgao, Dabolim) येथील काहींना ताब्यात घेऊन नंतर वैयक्तिक हमीवर सोडण्यात आले. यात वास्को मांगोरील येथील माजी नगराध्यक्ष सैफुल्ला खान, वास्को सासमोळे बायणा येथील सय्यद रियाज काद्री, वास्को काटे बायणा येथील मोहम्मद साजिद शेख, मुसा शेख, दाबोळी येथील नियाजी शेख, मुरगाव देस्तेरो येथील इमरान शेख, वास्को मांगोरील येथील अमीनुद्दीन मुल्ला यांना पीएफआय संघटनेच्या सदस्य असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते.

नंतर त्या सातही संशयीताना मुरगाव उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांच्या समोर उभे केले असता त्याची वैयक्तिक हमीवर सुटका केली. वास्को पोलीस उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी पी एफ आय संघटनेची संपर्क असल्याच्या संशयावरून या सर्वांना 151 कलमाखाली ताब्यात घेतले होते. वास्को पोलीस पुढील तपास करीत आहे.

PFI
Mavin Gudinho: गरबा व दांडिया स्पर्धेत मंत्री माविन गुदिन्हो यांनी धरला ठेका

दरम्यान, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि तिच्याशी संलग्न सर्व संघटना बेकायदेशीर असल्याचे आज गृह मंत्रालयाने घोषित केल्याने वास्कोतून याचे स्वागत होत आहे. या संघटनेशी संबंधित असलेल्यांची देशभरात धरपकड सुरू केली असून सुमारे दीडशेहून अधिक नेते-कार्यकत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दक्षिण गोव्यात या संघटनेच्या 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.यात वास्कोतून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून वास्को, मुरगाव, दाबोळी येथील सात जणांना ताब्यात घेऊन नंतर वैयक्तिक हमीवर सोडण्यात आले.या कारवाया अश्याच सुरु रहाव्या अशी सवॆ थरातून मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com