राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणारच; त्यास सामोरे जाण्याची क्षमता हवी: नाईक

मुरगावातील विकास कामांना चालना देण्याचे श्रेय मी माजी मुख्यमंत्री स्व:मनोहर पर्रीकर यांना देतो; मिलिंद नाईक
Milind Naik
Milind NaikDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत असतात, पण त्यास सामोरे जाण्याची क्षमता आपल्यात पाहिजे. तसेच राजकारणात मतभेद हे असतात पण त्याहीपेक्षा आपण त्या मतभेदातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणे तेवढेच महत्त्वाचे असते, अशी माहिती मुरगाव भाजप उमेदवार तथा आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी दिली. मुरगावातील विकास कामांना चालना देण्याचे श्रेय मी माजी मुख्यमंत्री स्व:मनोहर पर्रीकर यांना देतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प मुरगावात राबवण्यात मला यश आले असल्याची माहिती आमदार मिलिंद नाईक यांनी दिली.

Milind Naik
सामान्यांचे दुःख काँग्रेसशिवाय अन्य कोणताच पक्ष समजू शकत नाही: कामत

वास्को येथे आयोजित एका बैठकीत मुरगावचे माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर, उद्योजक राजन भोसले, माजी नगरसेवक संदेश मेस्ता, समाजसेवक हेमंत चोडणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुरगावचे भाजप उमेदवार मिलिंद नाईक यांना पाठिंबा जाहीर केला. सदर बैठकीत यावेळी नगरसेवक लिओ रॉड्रिगीस, रामचंद्र कामत, राजेंद्र नाईक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार मिलिंद नाईक म्हणाले की राजकीय क्षेत्रात विरोध हे होतच असतात. पण त्याला सामोरे जाण्याची क्षमता सुद्धा आपल्यात पाहिजे. राजकारण म्हणजे येथे मतभेद हे उद्भवणारच पण त्याहीपेक्षा मतभेदावर कशी मात करता येईल याचा विचार करणे गरजेचे असल्याची माहिती मिलिंद नाईक यांनी दिली. मुरगाव मतदारसंघातील विकासात महत्त्वाचा वाटा आहे तो माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर (भाई) पर्रीकर यांचा, त्यांचा दूरदृष्टी नेतृत्वामुळे आज मुरगावात विकास प्रकल्पांना चालना मिळाली आहे. राज्यात खाण व्यवसाय (Goa Mining) बंद पडल्याने मुरगाव बंदरावर अवलंबून असलेल्या मुरगाव वासियांना राज्य सरकारतर्फे नोकरी-व्यवसाय देण्यास थोडाफार प्रयत्न केला. भविष्यात मुरगावातील सडा, जेटी, रूमडावाडा, बोगदा, बायणा वासियांना सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची इच्छा असून ती पूर्ण करून देणार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant). यासाठी पुन्हा एकदा राज्यात भाजपला साथ देणे प्रत्येकाचे कर्तव्य असून त्यात गोव्यातील जनता आवश्यक मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे हात बळकट करून पंतप्रधान मोदी यांचे स्वयंपूर्ण गोवा करण्याचे स्वप्न पूर्ण करूया अशी माहिती शेवटी मिलिंद नाईक यांनी दिली.

यावेळी नगरसेवक लिओ रॉड्रिगीस यांनी सांगितले की गेली पंधरा वर्षे आमदार मिलिंद नाईक यांच्या सहकार्याने बायणा भागात बऱ्यापैकी विकास साधलेला असून यात आणखीन विकास होण्यासाठी पुन्हा एकदा मुरगावातून मिलिंद नाईक यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. समाजकार्यकर्ता हेमंत चोडणकर यांनी सांगितले की मुरगावचा विकास करण्याची क्षमता फक्त आमदार मिलिंद नाईक यांच्या जवळ असून त्यांचा विजय हा निश्चित आहे. माजी नगरसेवक संदेश मेस्ता म्हणाले की गेल्या पंधरा वर्षात सडा, बोगदा, जेटी, बायणा भागातील युवकांना रोजगार देण्यास आमदार मिलिंद नाईक यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पूर्वी सडा भागातील युवकांना सरकारी नोकर्‍या मिळणे खूपच कठीण होते. पण मिलिंद नाईक मुळे ते सिद्ध झाले. माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी सांगितले की मुरगावात विकास म्हणजे आम्हाला पूर्वी दिसतच नव्हता, पण मिलिंद नाईक आमदार होताच विकास कामाने मुरगावला अग्रेसर पोहोचवले आहे. सडा, बोगदा, जेटी, रुमडावाडा परिसरात एकेकाळी पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील होते, पण आमदार मिलिंद नाईक सर्वप्रथम येथील जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविला. नंतर एका पाठोपाठ अनेक प्रकल्पांना सुरुवात करून ते प्रकल्प जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. आमदार मिलिंद नाईक यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले ते माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर (भाई) पर्रीकर यांचे. यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली मुळे मुरगावात विकास कामे होत असल्याची माहिती खडपकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com