सामान्यांचे दुःख काँग्रेसशिवाय अन्य कोणताच पक्ष समजू शकत नाही: कामत

जनतेला फरक समजल्यानेच ‘भाजपा नको’ हा नारा गोव्यात बुलंद होऊ लागला आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.
Digambar Kamat
Digambar Kamat Dainik Gomantak
Published on
Updated on

कुडचडे: सामान्य कार्यकर्त्यांचे दुःख काँग्रेसशिवाय अन्य कोणताच पक्ष समजून घेऊ शकत नाही. म्हणूनच आज गोव्याची जनता काँग्रेस पक्षात सहभागी होत आहे. गोव्याची जनता दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या पाच वर्षाची आणि भाजपाच्या (BJP) दहा वर्षाच्या कार्याची तुलना करीत आहे. जनतेला फरक समजल्यानेच ‘भाजपा नको’ हा नारा गोव्यात बुलंद होऊ लागला आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.

कुडचडे येथील विविध राजकीय पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उमेदवार अमित पाटकर, काँग्रेस निरीक्षक विजय सिंग, मनोहर नाईक, गट अध्यक्ष पुष्कल सावंत उपस्थित होते. (Digambar Kamat News Updates)

Digambar Kamat
म्हापशात कांदोळकरांनाच संधी : ॲड. शशांक नार्वेकर

कामत म्हणाले, खाण (Goa Mining) हा गोव्याचा आर्थिक कणा असून, तो मोडून टाकण्याचे कारस्थान भाजपाने केले. शहा (Amit Shah) आयोगासमोर खोटा अहवाल सादर करून केवळ दिगंबर कामतला बदनाम करताना गोव्यातील बारीक लोकांना संपवून टाकले. परत असले सरकार हवे की नको ते निरखून पहावे.

स्व. पर्रीकरांच्या मुलाला तिकीट नाही, लक्ष्मीकांत पार्सेकर यांना उमेदवार नाही, हाच काय तो पार्टी विथ डिफरन्स असा प्रश्न कामत यांनी भाजपला केला.

सुधाकर नाईक म्हणाले, कुडचडेत बदलाचे वारे वाहू लागले आहे. उमेदवारांचा इतिहास तपासून पहा अमित पाटकर यांचे घराणे समाजसेवेचे. आजोबा, वडील आणि आता अमित पाटकर तीन पिढ्या कुडचडेच्या विकासासाठी कार्यरत आहेत.

कुडचडेत बदलाचे वारे: लोकायुक्त सांगते की, सावंत सरकार हे सर्वात भ्रष्टाचारी सरकार. सत्ता डोक्यात भरलेल्यांना लोक घरी पाठविणार. देव दामोदर आणि जनतेचा आशीर्वाद लाभला म्हणून आज आठव्यांदा निवडणूक लढवत आहे. दिगंबर एक खंबी तंबू आहे म्हणून लोक हिणवू लागले. पण, आज काँग्रेस तरुण तडफदार युवा उमेदवारांना घेऊन पुढे जात आहे. त्यामुळे कुडचडेत बदलाचे वारे वारे सुरू झाल्याचे कामत म्हणाले.

कॉंग्रेसमध्ये दाखल कार्यकर्ते असे: भाजपा, आम आदमी पक्षातील जेष्ठ कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यात प्रामुख्याने भाजपचे कुडचडेतील माजी नगरसेवक सुधाकर नाईक, दिगंबर आडपईकर, माजी युवा अध्यक्ष सुहास नाईक, माजी नगरसेवक श्रीकांत गावकर, असोल्डाचे माजी सरपंच तथा आप पक्षाचे नेते दयानंद नाईक, रोशन गावकर, कुडचडे काकोडाचे युवा नेते धीरज प्रभूदेसाई, मंदा नाईक या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com