कळंगुट: राज्यातील सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकमेकांच्या धार्मिक उत्सवातही मिळून मिसळून सहभागी होत आहेत. येथील धार्मिक सलोखा कायम आहे. राज्यातील कुठल्याही चर्चमधून धर्मांतर होत असल्याची प्रकरणे आतापर्यंत ऐकिवात आलेली नाहीत. त्यामुळे राज्यात धर्मांतर विरोधी कायदा अथवा विधेयक संमत करून घेण्याची मुळीच गरज नाही. प्रोटेस्टंट अथवा बिलीव्हर पंथांकडून असे प्रकार होत असतील परंतु त्यांचा कॅथलिक चर्च संस्थेशी काहीच संबंध नाही, असे व्यक्तव्य विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले. (There is no need for anti-conversion law in Goa")
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज व्यक्त केली होती. या व्यक्तव्यावर लोबो यांनी आपले मत मांडताना गोव्यात सर्वधर्मीय एकत्र असल्याने अशा कायद्याची गरज नसल्याचे सांगितले. खोब्रावाडा-कळंगुट येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कळंगुटचे सरपंच शॉन मार्टिन्स, उपसरपंच शेरॉल लोबो तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कळंगुटात पर्यटनासाठी येणाऱ्या देशी पर्यटकांवर हल्ले होत आहेत. त्यांची फसवणूक आणि लुबाडणूक होत असल्याचे मान्य करतानाच लोबो यांनी याभागातील बेकायदा चालणाऱ्या नाईट क्लबस तसेच त्यांच्याशी जोडलेल्या परप्रांतीय दलालांना जबाबदार धरले.
वाढत्या धर्मांतरावर काय म्हणाले होते मुख्यमंत्री प्रमोद सावंत
राज्यातील वाढत्या धर्मांतरावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चिंता व्यक्त केली होती. 16 रोजी एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले होते की, जलद धर्मांतरात उपेक्षित लोकांना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, राज्य सरकार असे कोणतेही कृत्य करू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
गोव्यातील कुडणे गावात एका कार्यक्रमात सावंत म्हणाले होते की, राज्याच्या विविध भागातील लोक धर्मांतराला पुढे नेत आहेत. समाजातील कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांचा फायदा हे लोक घेत आहेत. धर्मांतराबाबत कठोर भूमिका घेत सावंत म्हणाले की, राज्य सरकार कुठेही धर्मांतर होऊ देणार नाही. धर्मांतराबाबत जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सावंत म्हणाले की, गोव्यात पोर्तुगीज राजवटीत देव आणि संस्कृती नष्ट झाली. ज्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा जागे होण्याची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.