Vijay Sethupathi
Vijay SethupathiDainik Gomantak

IFFI 2023 : अभिनयाला कुठलाच फॉर्म्युला नाही : सेतुपती

IFFI 2023 : एका आकर्षक ‘संभाषण’ सत्रादरम्यान अभिनेते विजय सेतुपती आणि ज्येष्ठ अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी त्यांच्या सिनेमॅटिक प्रवासातील अनुभवांची कहाणी सादर केली.
Published on

IFFI 2023 : पणजी,उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपट निर्माण करण्यासाठी कुठलाच एक फॉर्म्युला नाही. पुढील काही वर्षे मी खलनायकाच्या भूमिका न करता वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारेन, असे दाक्षिणात्य सिनेअभिनेता विजय सेतुपती यांनी सांगितले.

कला अकादमी, गोवा येथे ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एका आकर्षक ‘संभाषण’ सत्रादरम्यान अभिनेते विजय सेतुपती आणि ज्येष्ठ अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी त्यांच्या सिनेमॅटिक प्रवासातील अनुभवांची कहाणी सादर केली.

विजय सेतुपती हे भारतीय चित्रपट उद्योगातील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी पहिली मुख्य भूमिका सीनू रामासामी यांच्या ‘थेनमेरकु पारुवकत्रू’मध्ये केली होती.

ज्या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते. ‘सुपर डिलक्स’ या चित्रपटातील एका तृतीयपंथी व्यक्तिरेखेच्या भूमिकेने सेतुपती यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. सेतुपती यांनी ठळकपणे सांगितले की, त्यांनी तृतीयपंथी व्यक्तींना सामोरे जाणाऱ्या वास्तविक जीवनातील संघर्षांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला.

Vijay Sethupathi
IPL 2023: Jio Cinema ने केला मोठा रेकॉर्ड, पहिल्या वीकेंडमध्ये 147 कोटी व्ह्यूज...

भूमिकांच्या तयारीसाठी चित्रपटाचा विषय समजून अनेकांशी चर्चा करणे गरजेचे असते. विशिष्ट भूमिकांपुरते मर्यादित राहू नये. कलाकाराने चित्रपट क्षेत्रात टिकून राहण्यासाठी त्याच्यातील शिकण्याची भावना जिवंत ठेवणे गरजेचे असते.

- विजय सेतुपती,

दाक्षिणात्य सिनेअभिनेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com