...तर मी निवडणुकीतून माघार घेईन: उत्पल पर्रीकर

भाजपचे दिग्गज नेते व उत्पल त्यांचे वडील मनोहर पर्रीकर यांनी दोन दशकांहून अधिक काळ पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
Utpal Parrikar Latest News Updates
Utpal Parrikar Latest News UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्पल पर्रीकर यांनी शुक्रवारी भाजप सोडून पणजी मधून अपक्ष गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, पक्ष सोडणे हा माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता, मात्र भाजपने पणजीमधून चांगला उमेदवार उभा केल्यास मी निवडणुकीतून माघार घईन.

Utpal Parrikar Latest News Updates
'शिवोलीतील रेस्टाॅरंटमधील बलात्काराची चौकशी करा'

भाजपचे दिग्गज नेते व उत्पल त्यांचे वडील मनोहर पर्रीकर यांनी दोन दशकांहून अधिक काळ पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती, मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारले. या निर्णयामुळे नाराज झालेल्या पर्रीकर यांनी शुक्रवारी पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे घोषित केले.

भाजपने (BJP) पणजी येथून त्यांचे विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे. मोन्सेरात यांनी जुलै 2019 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Utpal Parrikar Latest News Updates
'शिवोलीतील रेस्टाॅरंटमधील बलात्काराची चौकशी करा'

पक्ष सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. हा सर्वात कठीण निर्णय होता. मला हा निर्णय घ्यावा लागला याचे मला दुःख आहे, पण काही वेळा तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण पक्षाने पणजीतून चांगला उमेदवार उभा केल्यास मी माघार घेण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. उत्पल पर्रीकर यांनी दावा केला की त्यांना तिकीट नाकारणे ही परिस्थिती, 1994 मध्ये घडलेल्या प्रसंगासारखीच आहे जेव्हा मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांना पक्षातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ते म्हणाले, त्या वेळी मनोहर पर्रीकरांना बाहेर टाकता आले नाही कारण त्यांना लोकांचा पाठिंबा होता.

ते पुढे म्हणाले, “जेव्हा भाजप प्रमुख जे पी नड्डा गोव्यात आले, तेव्हा पाच जोडप्यांनी (पुढील महिन्याच्या निवडणुकीसाठी) पक्षाची तिकिटे मागितली होती. मनोहर पर्रीकर हयात असते तर एकाही पुरूष राजकारण्याने त्यांच्या पत्नीसाठी तिकीट मागण्याची हिंमत केली नसती."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com