Theft in Two Temples : उसगांवात दोन मंदिरे फोडली; अडीच लाख लंपास

उसगांव-गांजेतील प्रकार; दरवाजाचे कुलुपही पळविले; परिसरात खळबळ
Theft in Two Temples
Theft in Two TemplesDainik Gomantak
Published on
Updated on

Robbery In Usgaon: उसगांव-गांजे येथील गांजेश्वरी व शांतादुर्गा देवीच्या मंदिराचा मुख्य दरवजा तोडून फंडफेटीतून अडीच लाखांचा माल लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. चोरीची ही घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Theft in Two Temples
Goa Student : पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा जल्लोष

चोरट्यांनी रोख रक्क्म व समई, घंटा तसेच इतर वस्तूही पळविल्या. आश्चर्य म्हणजे, चोरट्यांनी दाराचे कूलपही ठेवले नाही.

घटनेची माहिती कळताच फोंडा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांचा तपास लागला नाही. लोटलीकर यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरिक्षक आदित्य गांवकर यांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

यासंदर्भात, देवस्थानाचे अध्यक्ष विजय गावकर म्हणाले, की चोरट्यांनी या दोन्ही देवालयाचे कुलुप फोडले. त्यांनी फंडपेट्यातून रोख रक्कम तसेच सहा मोठ्या घंटा, मोठ्या २ समई तसेच लहान पाच समई व इतर तांब्याची भांडी पळविली. गेल्या दहा बारा वर्षापूर्वी या दोन्ही देवालयात अशाच चोरीच्या घटना घडला होत्या तेव्हाही अशाच वस्तू नेल्या होत्या.

Theft in Two Temples
Goa Fraud Case : पैसे उकळण्यासाठी ‘त्या’ डॉक्टरवर आरोप: आयएमए

दरवाजाचे कुलुप सुद्धा चोरटे घेऊन गेले आहेत. त्यामुळे हे काम भंगार गोळा करणाऱ्यांचे असावे, असा अंदाज आहे.

बारा वर्षांपूवीचा तपास बाकी

गेल्या दहा बारा वर्षापूर्वी या दोन्ही देवालयात अशीच चोरीची घटना घडली होती. त्याचाही तपास अजून लागलेला नाही. निदान, आता तरी फोंडा पोलिसांनी या चोरट्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थ राजेश गावकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com