Goa Chandreshwar Temple: चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; दोन्ही सुरक्षारक्षक गैरहजर

सर्व रक्कम लंपास, चोरी सीसीटीव्हीत कैद
Theft in Chandreshwar Bhootnath Temple Goa:
Theft in Chandreshwar Bhootnath Temple Goa: Dainik Gomantak
Published on
Updated on

Theft in Chandreshwar Bhootnath Temple Goa: गेल्या रविवारी केपे बाजारात प्रवासी बसमध्ये चढताना दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरून नेल्या होत्या. हे प्रकरण ताजे असतानाच आज, सोमवारी आणखी चोरी उघडकीस आली आहे.

काल रात्री पर्वत परोडा येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानातील फंड पेटी फोडून त्यातील सुमारे दहा हजार रुपयांची रोकड अज्ञातांनी चोरून नेली.

Theft in Chandreshwar Bhootnath Temple Goa:
Goa Monsoon: गोव्यात बीचवर पोहण्यास बंदी; वॉटर स्पोर्ट्सही बंद

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री १२.३० ते २.३० च्या दरम्यान चोरी झाली असून मंदिराचा दरवाजा फोडून दोघा चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी फंड पेटी फोडून त्यातील रक्कम घेऊन पेटी मंदिराच्या पाठीमागील बाजूस टाकली.

आज सकाळी मंदिरातील बाहेरचे दिवे बंद करण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. तत्काळ पोलिसांना हा प्रकार कळविण्यात आला. दरम्यान, मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत.

Theft in Chandreshwar Bhootnath Temple Goa:
High Tide Alert in Goa: गोव्यात मंगळवारपर्यंत हायटाईडचा इशारा; लहान बोटी समुद्रात न नेण्याचे आवाहन

मंदिराचे मुख्यत्यार पंडित देसाई यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे दोन आठवड्यापूर्वी ही फंड पेटी उघडून आतील पैसे काढले होते. सध्या त्या पेटीत दोन आठवड्याचे पैसे होते.

दरम्यान, मंदिरच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली असून ते काल रात्री कामावर आले नव्हते. चोरीचा शोध घेण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी दाखल केले होते. केपे पोलिसांनी चोरीचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com