केरी-सत्तरीतील चित्रशाळांकडे वळली युवापिढी

घोटेलीतील 70 वर्षांची चित्रशाळा: मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग
The youth turned to Chitrashalas in sattari
The youth turned to Chitrashalas in sattariDainik Gomantak
Published on
Updated on

सपना सामंत

सत्तरी ही कलाकारांची भूमी असुन या निसर्गरम्य अशा सत्तरीत अनेक कलाकार आपली कला वेगवेगळ्या पध्दतीने व विविध मार्गाने सादर करत असतात. आजच्या पिढीने आपल्या मूर्ती कलेचा वारसा जपला पाहिजे,असे म्हटले जाते.मात्र, तसे होताना दिसत नाही.

The youth turned to Chitrashalas in sattari
बंगळुरूस्थित अक्षयपात्र फाउंडेशन देणार राज्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार...

केरी सत्तरी येथील मुकुंद नाईक यांची पारंपरिक गणेश चित्रशाळा याला अपवाद असून त्यांचा मूर्तिकलेचा वारसा, त्यांच्या मुलीने व पुतणी व पुतण्याने जोपासला आहे. आजच्या या युवा पिढीने आपली पारंपरिक चित्रशाळा पुढे नेण्यासाठी आतापासून हातभार लावण्यास सुरुवात केली आहे.

केरी घोटेली 1 येथील नाईक यांची चित्रशाळा ७० वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. मुकुंद यांचे वडील कै. वासुदेव विठ्ठल नाईक यांनी ही गणेश चित्रशाळा सुरू केली होती. त्यानंतर त्यांचा मोठा मुलगा कै. प्रकाश नाईक व मुकुंद नाईक यांनी त्यांचा वारसा पुढे नेला, आता मुकुंद नाईक यांच्या सोबत त्यांचा मोठा पुतण्या पृथ्वीराज , पुतणी प्राजक्ता, मुकुंद त्यांची कन्या साक्षी , रिया व सिया आपल्या काका व वडिलांना मदत करत आहेत.

The youth turned to Chitrashalas in sattari
महामार्गालगत मद्य परवाने; न्यायालय निवाड्याचे उल्लंघन

पावसाळा सुरु झाल्यानंतर त्यांना मूर्ती कामास सुरुवात केली. त्यांच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. केरी, रावण, मोर्ले, काॅलनी, पर्ये, चोर्ला, साखळी व इतर भागात त्यांच्या मूर्ती नेल्या जातात. नाईक यांच्या चित्रशाळेत एकूण २७५ गणेश मूर्ती तयार केल्या जातात. आता बहुतेक गणेश मुर्ती तयार करुन झालेल्या असून रंगकामास सुरुवात झाली आहे. या रंगकामासाठी त्यांना पुतणी प्राजक्ता मदत करते. ती गोमेकॉत परिचारिका असून नोकरी संभाळून ती ही कला जोपासत आहे.

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. मात्र गरीबातला गरीबही बाप्पांच्या स्वागतासाठी आतुरतेने गणेश चतुर्थीची वाट पहात आहेत. चित्रशाळा टिकवून ठेवण्यासाठी पुढच्या पिढीनेच पुढाकार घेतला पाहिजे तरच हे शक्य होईल. आमची मुले अभ्यास व नोकरी सांभाळून ही कला जोपासत आहेत. ही बाप्पांचीच किमया.

-मुकूंद नाईक, मूर्तिकार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com