बंगळुरूस्थित अक्षयपात्र फाउंडेशनने राज्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविण्याची बोली जिंकली आहे. परंतु प्रत्यक्षात या फाउंडेशनचे काम सुरू होण्यास काही आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात स्वयंसाहाय्य गटांतर्फे शालेय मुलांना माध्यान्ह आहार पुरविला जातो. परंतु काही ठिकाणी आहार पोहोचविण्यासाठी विलंब होत असल्याचे व अडचणीचे असल्याचे स्वयंसाहाय्य गटांनी शिक्षण संचालनालयाला कळविले होते.
त्यामुळे पाच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवायचा असेल तर मग इतर काही सामाजिक संस्थांद्वारे निविदा मागविण्यात आल्या त्यात अक्षयपात्र आणि स्त्री शक्ती या संस्था बोलीच्या अंतिम शर्यतीत होत्या. मात्र, गोवा सरकारने फाईल मंजूर केल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगाडे यांनी सांगितले.
अक्षयपात्र फाउंडेशन निविदा प्रक्रियेचा विजेता आहे. लवकरच ते विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचा पुरवठा सुरू करतील. बंगळुरूच्या या अक्षयपात्र फाउंडेशनतर्फे देशातील २४ राज्यांमध्ये ५ कोटी विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविला जातो.
असा पुरवणार आहार
अक्षयपात्र हे फाउंडेशन माध्यान्ह आहारात चपातीसोबत बटाटा भाजी, मिक्स व्हेजिटेबल इडली, मूग (पाताळ) भजी चपातीसोबत, मिक्स व्हेजिटेबल पुलाव, छोले चपाती, चपातीसोबत भाजी आणि चपातीसोबत व्हेज कुर्मा असा साप्ताहिक मेनू विद्यार्थ्यांना पुरवणार आहे. सरकारने माध्यान्ह आहाराच्या दरातही वाढ केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.