Panaji Traffic: पणजीतील ट्रॅफिक कंट्रोलचे काम कर्नाटकातील भाजप आमदाराच्या पुत्राला?

कंपनीचे सर्व्हरही बंगळूरमध्ये
AI for Panaji Traffic Control
AI for Panaji Traffic ControlDainik Gomantak

AI for Panaji Traffic Control: गोव्याची राजधानी पणजी येथे ट्रॅफिक कंट्रोलसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मेरशी जंक्शन येथे ‘बेलटेक AI’ कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

तथापि, ही कंपनी कर्नाटकातील भाजप आमदाराच्या पुत्राची असल्याचे समोर आले आहे. काही इंग्रजी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

AI for Panaji Traffic Control
MLA Delilah Lobo: पर्यटकांना मारहाण ही अ‍ॅक्शनची रिअ‍ॅक्शन; कर्मचाऱ्यांची चूक नाही, पर्यटकांवरच गुन्हा नोंदवा!

बेलटेक AI कंपनी अगस्त्य बेलाड यांची आहे. अगस्त्य हे कर्नाटकातील भाजप आमदार अरविंद बेलाड यांचे पुत्र आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे म्हादई नदीच्या पाणी वाटपाच्या मुद्यावरून आधीच गोव्यात कर्नाटकविरोधात नाराजी आहे.

शिवाय पणजीमध्ये सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. यातील कामे Imagine Panaji Smart City Development Limited (IPSCDL) तर्फे केली जात आहे. या कंपनीने 180 कोटी रूपये खर्चून अशाच पद्धतीची AI यंत्रणा विकसित केली आहे.

त्यामुळे अशा कामाचा अनुभव असूनही IPSCDL कडून हे काम न करून घेता कर्नाटकातील भाजप आमदाराच्या मुलाच्या कंपनीला कशासाठी दिले, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत IPSCDL ने अल्तिनो येथील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कार्यालयात इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) ची स्थापना केली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ई-चलन जारी करण्यासाठी एआय-सक्षम असलेले 338 स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावले आहेत.

पणजी, पर्वरी, मेरशी, रायबंदर जंक्शन, दोना पावला, ताळगाव येथे हे कॅमेरे बसवले आहेत. IPSCDL ने L&T ला चाचण्या सुरू करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. दोन्ही यंत्रणा समान आहेत. तथापि, बेलटेकचे सर्व्हर बेंगळुरूमध्ये आहेत. तर L&T चे नियंत्रण कक्ष अल्तिनो येथे आहे.

AI for Panaji Traffic Control
Goa Traffic: सलग तिसऱ्या दिवशी पणजीत वाहतूक कोंडी

अल्टिन्हो येथील ICCC येथे रीअल टाइममध्ये रहदारी व्यवस्थापन AI द्वारे नियंत्रित करता येते. हेच काम मेरशी येथे होणार आहे.

‘बेलटेक AI’ कंपनीने सलग दोन आठवडे मेरशी जंक्शनवर 16 कॅमेरे बसवून तेथील वाहतुकीचे निरीक्षण केले होते. पूर्वी या जंक्शनवर ‘पीक वेटिंग’ वेळ 12 ते 15 मिनिटे असायचा. पण, ही प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर हा वेळ 4 ते 6 मिनिटांवर आला.

पूर्वी तेथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चार वाहतूक पोलीस लागत होते. परंतु, आता केवळ एकच वाहतूक पोलीस लागतो. यात सीसीटीव्हीद्वारे वाहतूक कोंडी होणारे रस्ते तसेच सिग्नल्सवर नियंत्रण ठेवता येते.

त्या भागांतील इतर सिग्नल्सही एकमेकांना कनेक्ट केले जातात. एखाद्या जंक्शनवर वाहतूक कोंडी झाल्यास मागून येणाऱ्या वाहनांमुळे त्यात आणखी भर पडू नये यासाठी मागील जंक्शनवरील सिग्नल तत्काळ सक्रिय करून वाहने थांबवली जातात.

रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना तत्काळ मार्ग मोकळा करून देता येतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ‘ट्रॅक’ करून ई-चलन जारी करता येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com