Goa: राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

उगवे पेडणे या राष्ट्रीय महामार्ग 66 ला पडलेले शेकडो खड्डे वृत्त प्रसिद्ध होताच बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झालेने वाहन चालकांमध्ये समाधान मिळाले आहे.
The work of filling the potholes on the national highway in Goa started at war level
The work of filling the potholes on the national highway in Goa started at war levelDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पत्रादेवी ते धारगळ पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग 66 या रस्त्याला शेकडो भलेमोठे खड्डे पडलेले होते, या खड्ड्यातून दुचाकी वाहने चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देत असे. चतुर्थीच्या काळात या खड्ड्यातून गणेश मुर्त्या कश्या नियोजित स्थळी न्याव्यात अशी गंभीर समस्या स्थानिक नागरिकांसमोर होती. जे खड्डे पडलेले होते त्यातून वाहने चालवताना जीव मुठीत धरून चालवावी लागायची , दुचाकी वाहने चालवणे म्हणजे एक प्रकारची सर्कस होती.

The work of filling the potholes on the national highway in Goa started at war level
Goaतील गणेशभक्तांना खड्ड्यांचे विघ्‍न!

उगवे पेडणे या रस्त्याला अर्धाकीलोमीटर रस्त्यालाच शेकडो जीव घेणे खड्डे पडलेले होते. त्या खड्ड्यात 6 रोजी कॉंग्रेस प्रवक्ते विठू मोरजकर यांच्या नैतृत्वाखाली पेडणे गट कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष रुद्रेश देशप्रभू व स्थानिकांनी या खड्ड्यात झाडे लावून सरकारचा निषेध केला होता. चतुर्थी पूर्वी हे खड्डे बुजवले नाही तर अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिला होता.

The work of filling the potholes on the national highway in Goa started at war level
Goa Mining: राज्यातील खाणकाम तीन वर्षांपासून बंद,अर्थचक्राला 20 हजार कोटींचा फटका
National Highway 66
National Highway 66Dainik Gomantak

तश्या प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम हमरस्ता विभाग खडबडून जागे झाले आणि पडलेले खड्डे बुजवण्याचे काम, युद्ध पातळीवर सुरु केले. एका बाजूने जोरदार पाऊस पडत असल्याने खड्डे बुजवताना अडचणी येत होत्या. तरीही नागरिकांची मागणी आणि गैरसोय लक्षात घेवून खड्डे अडचणीवर मात करत बुजवण्याचा प्रयत्न चालू होता. दरम्यान आम आदमी पार्टीनेही चतुर्थीपूर्वी खड्डे बुजवले नाही तर रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com