गोव्यातील खाण (Goa Mining) समुदाय - खाण कामगार, रसद उद्योगात काम करणारे लोक, बार्ज, बंदरे आता सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडे (Goa Government) अपील करत आहेत की सलग चौथा खाण हंगाम संपण्यापूर्वी राज्यातील खाणि पुन्हा सुरू कराव्यात .
राज्याच्या अर्थव्यवस्थेचे (Goa Economy) पुनरुज्जीवन करण्याच्या आणि खाण या उद्योगावर आपली उपजीविका भागवणाऱ्या लोकांच्या हितासाठी, खाणीचे त्वरित पुनरुत्थान करणे अत्यंत महत्वाचे आहे. सध्या गोव्यातील एका विभक्त कुटुंबाचे सरासरी कर्ज 5 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. राज्यातील सर्व खाण उपक्रमांवर बंदी घातल्यामुळे राज्याचे 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत आहे.
गोव्यातील लोकांवर आणि अर्थकारणावर होणाऱ्या परिणामाची दूरदृष्टी न ठेवता किंवा कुठलीच चिंता न करता राज्यातील सर्व खाण उपक्रम स्थगित ठेवून आज जवळपास साडेतीन वर्षे झाली पूर्ण झाली आहेत. खाणकामांवर अवलंबून असलेल्या गोव्यातील 15 ते 20 टक्के लोकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी विलंबाने न्याय मिळाल्यामुळे खाण अवलंबित लोकांच्या तक्रारी आणि भीती आणि भाडेपट्ट्यांच्या लिलावासाठी खाण महामंडळ स्थापन करण्याच्या सध्याच्या घडामोडींमुळे गोवेकरांना विश्वास किंवा स्पष्टता मिळत नाही की सरकारने सुरू केलेल्या या प्रक्रिया या समस्येचे निराकरण कसे करेल.
राज्यात खाण हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो आणि राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी एप्रिलमध्ये हा हंगाम संपतो. अगदी एक महिन्यावर येणार हा हंगाम आल्याने गोवेकर आता विनंती करत आहेत कीलवकरात लवकर खाण उपक्रम पुन्हा सुरू करावेत जेणेकरून गोवेकरांना यावर्षी राज्यातील सामाजिक-आर्थिक गाडा रुळावर येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्यातील 3,00,000 जनजीवन प्रभावित झाल्यामुळे राज्यातील सर्व खाण उपक्रम 16 मार्च 2018 रोजी अचानक बंद करण्यात आले होते.
गोव्याचे खाण क्षेत्र हे गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. आणि आतापर्यंत राज्यात रोजगार निर्मितीचे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचा अंदाज आहे. पण सध्या राज्यातील खाण क्षेत्र 60,000 नोकऱ्यांपैकी फक्त 7,000 नोकऱ्या त्यांच्या हातात आहेत. खाण उद्योग 70 वर्षांहून अधिक काळ गोवांच्या उपजीविकेला आणि अर्थकारणाला आधार देत आहे.
हा व्यवसाय बंद असल्याने त्याच्याशी निगडित असलेले ट्रक आणि इतर वाहने देखील बंदच आहेत. हेसारे काही लोकांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव स्त्रोत होते आणि खाण व्यवसायने अनेकांच्या कुटुंबांना आधार देण्यास मदत केली. खाण उपक्रमांशिवाय, यापैकी काही मालमत्ता आधीच बँकांनी पुन्हा ताब्यात घेतल्या आहेत.
एकीकडे खाणकाम बंद असल्याने गोव्याच्या अर्थचक्राचे चाक फसले असतानाच दुसरीकडे कोरोना महामारीने लागलेल्या लॉकडाऊनने गोव्याचा मुख्य व्यापार असलेले पर्यटन क्षेत्र देखील पूर्ण बंद पडले आहे. पर्यटन क्षेत्राच्या मंदीने राज्याच्या खडबडीत अर्थव्यवस्थेला आणखीनच चिघळवले आहे.
अशा प्रकारे सलग चौथ्या खाण हंगामापूर्वी तात्काळ प्रभावाने राज्यात खाणकाम पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे आणि परिस्थिती सुधारण्याची संधी अनुत्पादक आहे, असे गोवा खाण समुदायाने सांगितले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.