Ganesh Chaturthi: डिचोलीत चतुर्थीपूर्वीचा आठवडी बाजार ‘थंड’

Bicholim Market: पावसामुळे विक्रेत्‍यांमध्‍ये चिंतेचे वातावरण, साहित्‍य ठेवावे लागले झाकून
Bicholim Market
Bicholim Market Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थी हा गोमंतकीयांचा सर्वांत मोठा सण तोंडावर आला असताना पावसाने पुन्‍हा हजेरी लावल्‍याने विक्रेत्‍यांमध्‍ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज बुधवारी पावसाने कहर केल्यामुळे डिचोलीतील आठवडी बाजारावर बराच परिणाम जाणवला. विशेष म्‍हणजे आजचा आठवडी बाजार हा चतुर्थीपूर्वीचा शेवटचा बाजार होता. मात्र पावसामुळे तो थंडावला.

Bicholim Market
South Indian Restaurants : कळंगुटमध्ये हे आहेत 'साऊथ इंडियन' पदार्थांसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट्स; नक्की भेट द्या!

डिचोली (Bicholim) बाजारातील काही विक्रेत्यांना पावसामुळे आपापले साहित्‍य बंद करून ठेवावे लागले आणि बहुतांश ग्राहकांनीही बाजाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे आजच्या बाजारातील उलाढालीवर मोठा परिणाम झाला.सकाळी जोरदार पाऊस बरसल्यानंतर आठवडी बाजारात व्यवसाय करणाऱ्या बहुतेक विक्रेत्यांना आपले साहित्‍य झाकून ठेवावे लागले.

दुपारी साधारण तासभर पावसाने विसावा घेतला खरा, मात्र नंतर पुन्हा साधारण दीड वाजता अर्धा तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सायंकाळपर्यंत पावसाळी वातावरण राहिल्याने डिचोली बाजारावर मोठापरिणाम जाणवला.

Bicholim Market
Jyoti Kunkolienkar : लेकीनंतर आईलाही ‘साहित्य अकादमी’चा बहुमान

ग्राहकांनी फिरविली बाजाराकडे पाठ

चतुर्थीपूर्वीचा शेवटचा आठवडी बाजार असल्याने आज बाजारात गर्दी उसळण्याची शक्यता होती. मात्र पावसामुळे बहुतांश नियमित ग्राहक बाजाराकडे फिरकलेच नाहीत. दुपारी आणि सायंकाळी भाजी बाजारात किंचित वर्दळ दिसून आली. बहुतांश विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. पावसामुळे ग्राहकांची संख्या रोडावली. सायंकाळी भाजी मार्केटमध्‍ये काहीसी गर्दी जाणवली. पावसामुळे अपेक्षेप्रमाणे व्‍यवसाय झालाच नाही. व्यवसायावर बराच परिणाम झाला, असे अजित परब या दुकानदाराने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com