Ponda News: फोंड्यात घरांमध्ये, दुकानात घुसले तुंबलेल्या नाल्याचे पाणी; स्थानिकांचे नुकसान

पोलिस स्थानकासमोरील रस्त्याला तळ्याचे स्वरूप
Ponda Police Station
Ponda Police Station Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News: पावसाला सुरवात होऊन काही दिवस होत नाहीत तोपर्यंतच नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच प्रशासनाच्या त्रुटीही समोर येत आहे. फोंडा तालुक्यात तुंबलेल्या नाल्याचे पाणी घरात, दुकानात घुसले आहे. यात स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Ponda Police Station
Goa Accident: सुकतली मोले येथे महामार्गावर भरधाव टेम्पोची ट्रकला धडक; चालक जखमी
Rain water in home in Ponda
Rain water in home in PondaDainik Gomantak

फोंडा पोलीस स्थानकासमोर असलेला नाला तुंबल्याने नाल्यातील पाणी येथील जी. डी. खासनिस यांच्या घरात गुडघाभर पाणी साचले आहे. शिवाय त्यांच्या घरासमोरील अंगणातील तुळचीचे वृंदावन नाल्याच्या पाण्यात बुडले आहे.

याशिवाय येथील दुकाने, बेकरीमध्येही पाणी घुसले आहे. त्याचा प्रचंड मनस्ताप स्थानिकांना होत असून प्रशासनाने तत्काळ यावर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. पोलिस स्थानकासमोरील रस्त्यावरून हे पाणी वाहत असून रस्त्यालाच नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Ponda Police Station
Goa Traffic Rules Violation: सर्वाधिक प्रकरणं ओव्हर स्पीडिंगची, पाच महिन्यात तब्बल एवढा दंड वसूल
ponda rain
ponda rain Dainik Gomantak

याचा एकूण परिणाम वाहतुकीवरदेखील झाला आहे. नाल्याचे पाणी तुंबून घरांमध्ये घुसल्याने नागरिकांसमोर राहण्याची अडचण झाली आहे. परिसरातील जनजीवन या सुरवातीच्या पावसानेच विस्कळीत झाले आहे.

सुरवातीच्या पावसातच अशी परिस्थिती उद्भवल्याने पावसाळ्यापुर्वी केल्या गेलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच प्रशासनाच्या कामाकडेही नागरिक बोट दाखवत आहेत. तर काही स्थानिकांनी नाल्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांनाही जबाबदार धरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com