Goa Traffic Rules Violation: सर्वाधिक प्रकरणं ओव्हर स्पीडिंगची, पाच महिन्यात तब्बल एवढा दंड वसूल

नियम उल्लंघन सुरूच : 15.12 कोटी दंडाची रक्कम जमा; स्पीड रडार गन्सचा वापर पूल, महामार्गांवर
Goa Traffic Rules Violation
Goa Traffic Rules ViolationDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : राज्यात रस्ता अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवूनही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याची प्रकरणे वाढतच आहेत. यावर्षी गेल्या पाच महिन्यांत सुमारे 2 लाख 59 हजार वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दंडात्मक कारवाईतून पोलिस व वाहतूक खात्याकडे सुमारे 15.12 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.

ओव्हर स्पिडिंग तसेच धोकादायकपणे वाहने चालवण्याच्या प्रकरणांबरोबरच हेल्मेट न वापरता वाहन चालवण्याच्या प्रकरणांतही वाढ झाली आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस विभागाने दिली. या पाच महिन्यांच्या कालावधीत 5,134 प्रकरणे ओव्हर स्पिडिंगची नोंद झाली आहेत तर धोकादायक वाहन चालवून इतरांना धोका निर्माण करणारी 2,434 प्रकरणे पोलिसांनी नोंदवली आहेत. याव्यतिरिक्त सिग्नल तोडून जाणे, विरुद्ध दिशेने वाहन घेऊन येणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे तसेच सिग्नलच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगवर वाहन घेऊन उभे राहणे किंवा थांबा असलेली रेषा ओलांडणे असे अनेक प्रकार वाहनचालकांच्या नकळत घडले आहेत व त्याच्यापोटी त्यांना दंडात्मक कारवाईची चलने त्यांच्या पत्त्यावर आली आहेत.

Goa Traffic Rules Violation
Bicholim News : डिचोलीत चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक; दोन ट्रक जप्त, चालकाला अटक

नवीन मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीनुसार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक रक्कम भरमसाट असल्याने महसूलही वाढला आहे. गेल्या वर्षी याच पाच महिन्यांत दंडात्मक रक्कम 6.63 कोटी जमा झाली होती. तर यावर्षी ती 15.12 कोटींवर पोहोचली आहे. या काळात मद्यप्राशन करून वाहन चालवण्याती सुमारे 4,570 प्रकरणे नोंद झाली आहे. याशिवाय सीट बेल्ट न लावण्याची 1,297 प्रकरणे, प्रमाणापेक्षा वाहनांमध्ये अधिक प्रवासी बसवण्याची 19,100 प्रकरणे तर हेल्मेटशिवाय वाहन चालवण्याची 7, 500 प्रकरणे नोंद झाली आहेत.

Goa Traffic Rules Violation
Goa Accident: सुकतली मोले येथे महामार्गावर भरधाव टेम्पोची ट्रकला धडक; चालक जखमी

नियमांची अंमलबजावणी व्हावी

नवीन मोटार वाहन कायदा दुरुस्ती नियमांत वाहन चालकाचा परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे, त्याची सक्तपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. राज्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्पीड रडार गन्सचा वापर महामार्ग तसेच धोकादायक वळणांवर केल्यास वाहनचालकांना वचक बसू शकतो. सध्या असलेल्या स्पीड रडार गन्सचा वापर पूल तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गावर केला जात असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com