Valpoi News : वाळपईचा मतदार खरा स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्ता; भाजपला केवळ २८० मतांची आघाडी

Valpoi News : वाळपई काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा नेने म्हणाले की, पालिका क्षेत्रात एकूण दहाही प्रभागांत भाजपचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची सत्ता आहे.
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, वाळपई मतदारसंघातून विशेषकरून वाळपई नगरपालिका क्षेत्रातील दहाही प्रभागांत भाजपची सत्ता असूनही काँग्रेस पक्षाने आपले अस्तित्व ठेवले आहे.

त्यामुळे वाळपई नगरपालिका क्षेत्रातील मतदार हा खरा स्वाभिमानी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, मतदार ठरलेला आहे. त्याबद्दल वाळपई काँग्रेस मंडळातर्फे जनतेचे आभार मानून या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

वाळपई क्षेत्रात प्रभाग एक, दोन, चार, सहा, आठ या प्रभागात भाजपला यश मिळाले. परंतु अन्य प्रभागात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. एकूण दहाही प्रभागांतून भाजपला केवळ २८० मतांची आघाडी मिळाली आहे. पालिका क्षेत्रातून भाजपला २,७५१ मते, काँग्रेसला २,४७१ मते तर ‘आरजी’ला २२६ मते मिळाली आहेत.

Valpoi
Goa Traffic Police: गोवा पोलिसांनी मद्यपी चालकांना दाखवला 'पोलिसी खाक्या'; 249 गुन्हे दाखल; 2124 प्रकरणे उघडकीस

वाळपई काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा नेने म्हणाले की, पालिका क्षेत्रात एकूण दहाही प्रभागांत भाजपचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची सत्ता आहे. सर्व नगरसेवक भाजपचेच आहेत. निवडणूक काळात मोठा गाजावाजा करीत भाजपने जोरदार प्रचार केला होता. ‘हर घर मोदी’ हे चित्र प्रचंड प्रमाणात उभे केले होते. दररोज वाळपईत सभा, बैठकांचा सपाटाच लावला होता.

तरीही पालिका क्षेत्रातील स्वाभिमानी काँग्रेस मतदारांनी मोठा लढा देत भाजपच्या मोठ्या आघाडी मिळविण्याच्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडाच केला आहे. भाजपला केवळ २८० मतांची आघाडी मिळालेली आहे. ग्रामीण भागातून मात्र लोकांनी आम्हाला साथ दिली नाही.

प्रभाग ५मधून भाजपला केवळ ६३ मते, ७मधून ८४ मते, ९मधून १९९ मते, तर काँग्रेसला ४१३ मते, १०मधून भाजपला २३० मते तर काँग्रेसला ३१४ मते मिळाली आहेत. एकूण मतांचे गणित पाहिल्यास भाजपला केवळ २८० मतांची आघाडी मिळाली, असे काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर म्हणाल्या.

भाजपची आघाडी केली कमी

काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर म्हणाल्या की, वाळपई पालिका क्षेत्रात भाजपने प्रचारकार्यात कंबर कसली होती. प्रत्येकाच्या हातात मोदींचा चेहरा देत प्रचाराला गती दिली होती; पण वाळपईतील स्वाभिमानी जनतेने भाजपच्या विचारांना तिलांजली देत पालिका क्षेत्रात भाजपला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. वाळपईत काँग्रेसचे काहीच अस्तित्व नाही. असे चित्र निर्माण केलेल्या भाजपला वाळपईच्या जनतेने चपराक दिलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com