Raigad: पोटासाठी येत होता गोव्याला... भूक लागली म्हणून खाली उतरला, रायगडमध्ये घडले असे की जीव गमावला

भूक लागली म्हणून मजूर ट्रेन थांबल्यावर ते जेवण आणायला गेले. दरम्यान, यावेळी त्यांची ट्रेन चुकली.
Raigad Accident
Raigad AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Raigad Train Accident: झारखंड राज्यातून पोटासाठी गोव्यात येणाऱ्या मजुराचा रायगड, महाराष्ट्रात झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे महाड येथे ही घटना घडली.

परव गोप (वय 40, रा. गोईंधरा, झारखंड) असे मजुराचे नाव आहे. गीतांजली एक्स्प्रेसने गोव्याला जात असताना भूक लागली म्हणून खाली उतरला. दरम्यान, त्यानंतर त्याच्यासोबत पुढे रायगड येथे झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

(Person Going to Goa died in Train Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील परव गोप झारखंडच्या गोईंधरा येथून गोव्यात काम करण्यासाठी येत होते. सोमवारी दुपारी राउरकेलाला येथून गोप यांनी गोव्यासाठी गीतांजली एक्स्प्रेसने प्रवासाला सुरूवात केली. परवसोबत त्याचे तीन साथीदार घुरणा खाडिया, रमेश खाडिया आणि महलू खाडिया हेही होते.

मंगळवारी उशिरा ट्रेन मुंबईला पोहोचली, गोप यांना भूक लागली म्हणून ट्रेन थांबल्यावर ते जेवण आणायला गेले. दरम्यान, यावेळी त्यांची ट्रेन चुकली. यानंतर दुसरी ट्रेन पकडून ते गोव्याला रवाना झाले. पुढे परव गोप ट्रेनमधून खाली पडल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.

Raigad Accident
Panaji Smart City: क्या है तुम्हारे शहर का हाल..? आजकाल पणजीतील रस्ते असे दिसताहेत, पाहा फोटो

परव गोप यांचा जखमी अवस्थेतील मृतदेह महाड पोलिसांनी बुधवारी सकाळी जखमी रुळावरून बाहेर काढला. परव ट्रेनमधून खाली पडल्यानंतर त्यांना दुसऱ्या ट्रेनने धडक दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परव यांचे दोन्ही पाय आणि एक हात रेल्वेने कापला होता.

परव यांचा मृतदेह मिळालेल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच परव यांनी ट्रेनमधून पडून जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले. नातेवाइकांनी या प्रकरणाची माहिती बिलिंगबिरा पंचायतीच्या प्रमुखांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com