वेर्णा वेश्‍‍याव्‍यवसाय प्रकरण; संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला

संशयित वेश्‍‍याव्‍यवसायातून मिळणाऱ्या उत्‍पन्नावर गुजराण करीत होता
bail
bailDainik Gomantak
Published on
Updated on

नागोवा-वेर्णा येथील वेश्‍‍याव्‍यवसाय प्रकरणातील पुणे येथील दिनेश कामू सकात (42) या संशयित आरोपीला जामिनावर सोडण्‍यास मडगावच्‍या सत्र न्‍यायालयाने शनिवारी (ता.20) नकार दिला. त्याचा अर्ज फेटाळून लावला.

सरकारपक्षातर्फे सरकारी वकील संजय सामंत यांनी काम पाहिले. अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश बाॅस्‍को रॉबर्ट्‌स यांच्‍या न्‍यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. वेश्‍‍याव्‍यवसाय प्रकरणासंबंधी भादंसंच्‍या ३७०, ३७० अ (२) त्‍याचप्रमाणे ‘इम्मॉरल ट्रॅफिक प्रिवेन्‍शन ॲक्‍ट १९५६ च्‍या ३, ४, ५, ६ आणि ७ कलमांखाली अटक करण्‍यात आली आहे, असे न्‍यायालयात स्‍पष्‍ट करून आपल्‍याला जामिनावर सोडण्‍यात यावे, अशी विनंती संशयिताने केली होती.

bail
World Turtle Day 2023 : मोरजीत यंदा 69 सागरी कासवांची 5,703 अंडी

दरम्यान, न्‍यायालयात सादर केलेल्‍या आरोपपत्रानुसार वेर्णा पोलिसांनी २३ जुलै २०२० रोजी सायंकाळी ७.३० वाजण्‍याच्‍या सुमाराला नागाेवा येथील महाराजा हॉटेलच्‍या मागे असलेल्‍या फ्रेमीओफी इमारतीतील एका फ्‍लॅटमध्‍ये छापा मारला होता.

यावेळी पोलिसांच्‍या निदर्शनाला असे आढळून की, पश्‍चिम बंगालमधील युवतीला या फ्‍लॅटवर आणून ठेवण्‍यात आले होते आणि हा फ्‍लॅट कुंटणखान्‍याच्‍या पद्धतीने चालविण्‍यात येत होता. हा आरोपी ग्राहकांना या फ्‍लॅटवर आणून येथील मुलींना ग्राहकांना पुरवित होता आणि वेश्‍‍याव्‍यवसायातून मिळणाऱ्या उत्‍पन्नावर या प्रकरणातील संशयित आरोपी गुजराण करीत होता, असे आरोपपत्रात नमूद करण्‍यात आलेले आहे.

bail
गुंतवणूकदारांना लुटणाऱ्या मनोजकुमारला सशर्त जामीन

गावडे यांचा जामीन अर्जाला आक्षेप

  1. आपण गेली २ वर्षे ९ महिने कोठडीत असून या खटल्‍यात आणखी एक आराेपी होता आणि त्‍याला उच्‍च न्‍यायालयाने जमिनावर सोडले होते. त्‍याच धर्तीवर आपल्‍यालाही जामिनावर सोडण्‍यात यावे, यासाठी पुण्‍याच्‍या या संशयित आरोपीने मडगावच्‍या सत्र न्‍यायालयाकडे अर्ज केला होता.

  2. १९ मे २०२३ रोजी पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांनी या जामीन अर्जाला तीव्रपणे आक्षेप घेतला. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्‍यानंतरच आणि पुरावे गोळा केल्‍यानंतरच न्‍यायालयापुढे आरोपपत्र सादर केलेले असल्‍याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनाला आणून दिले.

  3. तसेच या संशयित आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केल्‍यास तो फरार होण्‍याची शक्‍यता आहे तसेच खटल्‍याच्‍या कामकाजालाही विलंब होण्‍याची शक्‍यता असल्‍याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनाला आणून दिले आणि म्‍हणून न्‍यायालयाने या संशयिताचा हा अर्ज फेटाळावा, अशी गावडे यांनी न्‍यायालयाकडे विनंती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com