Spirit of Goa Festival: अनोखे मिश्रण असलेली संस्कृती, हीच गोव्याची ओळख! ‘स्पिरिट ऑफ गोवा' मध्ये मंत्री गुदिन्होंचे प्रतिपादन

Spirit of Goa Colva Festival: गोवा पर्यटन खात्याने आयोजित केलेल्या ‘स्पिरिट ऑफ गोवा फेस्टिव्हल''चे आज कोलवा येथील ‘साग’ मैदानावर सुरुवात झाली.
Spirit of Goa Festival, colva
Spirit of Goa Festival, colvaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सर्व समाजाच्या संस्कृतींचे अनोखे मिश्रण असलेली संस्कृती हीच गोव्याची खरी ओळख असून या संस्कृतीकडे आकर्षित होऊनच जगभरातील पर्यटकांची पावले गोव्याकडे वळतात, असे पंचायतमंत्री माविन गुदीन्हो यांनी सांगितले.

गोवा पर्यटन खात्याने आयोजित केलेल्या ‘स्पिरिट ऑफ गोवा फेस्टिव्हल''चे आज कोलवा येथील ‘साग’ मैदानावर सुरुवात झाली. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि बाणावलीचे आमदार वेंझी विएगस तसेच पर्यटन संचालक केदार नाईक हे उपस्थित होते.

गुदिन्हो म्हणाले, की सध्या गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात ही गोष्ट जरी खरी असली तरी आम्ही अजून समाधानी नाही. गोव्यात चांगले पर्यटक यायला हवेत आणि अशा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे महोत्सव आयोजित करणे गरजेचे आहे, असेही गुदिन्हो यावेळी म्हणाले.

वेन्झी व्हिएगस यांनी हा महोत्सव कोलवा येथे आयोजित केल्याने दक्षिण गोव्यातही पर्यटकांचा ओघ वाढेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर दिगंबर कामत यांनी अशा महोत्सवातून गोव्याची संस्कृती पर्यटकांना समजू शकेल, असे सांगितले.

Spirit of Goa Festival, colva
Goa Tourism: गोवा टुरिझमचा दुबईत डंका! ‘अरेबियन ट्रॅव्हल मार्केट’मध्ये सहभाग, पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न

स्थानिक कलावंतांना संधी

या महोत्सवात गोव्यातील पारंपरिक पाककृतींचे मास्टरक्लासेस, मिक्सोलॉजी कार्यशाळा, गोव्यातील आघाडीच्या मद्यनिर्मात्यांचा फेणी अनुभव केंद्र, गोमंतकीय कलाकौशल्यांचे सादरीकरण, रंगीबेरंगी फोटो बूथ व लहानथोरांसाठी खास काजू स्टॉम्पिंग या सत्रांची मेजवानी देखील ठेवण्यात आली आहे. तसेच सांगीतिक कार्यक्रमांसाठी जर्मनीतील कोडा या आघाडीच्या ऑडिओ ब्रँडच्या अत्याधुनिक साउंड सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे, ज्यावर गोव्याच्या स्थानिक कलावंतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

Spirit of Goa Festival, colva
Goa Tourism: 'जे चुकत आहे ते दुरुस्त करा', पर्यटकांच्या घटत्या संख्येवर लोबोंचा सल्ला; मंदीचे सावट, रेस्टॉरंट्स बंद पडण्याची भीती

खाद्यसंस्कृतीचे दर्शन

या उत्सवात ४० दलाने असतील आणि पारंपरिक जीआय-टॅग असलेली काजू फेणी, नावीन्यपूर्ण फेणी इन्फ्युजन्स, प्रीमियम जीन, क्राफ्ट बियर व देशी-विदेशी घटकांपासून बनवलेले नवनवीन मद्य यांचा समावेश असेल. पारंपरिक नारळ व काजू आधारित पदार्थांपलीकडे जात, केळफुलं, कोकम, कच्चा फणस, बिंबळी, आंबा यांसारख्या स्थानिक घटकांचा वापर करून सारस्वत, कोकणी, ख्रिश्चन आणि फ्युजन खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com