Goa MLA Michael Lobo on tourism slowdown, Goa Tourism News Updates
Goa MLA Michael Lobo on tourism slowdown Dainik Gomantak

Goa Tourism: 'जे चुकत आहे ते दुरुस्त करा', पर्यटकांच्या घटत्या संख्येवर लोबोंचा सल्ला; मंदीचे सावट, रेस्टॉरंट्स बंद पडण्याची भीती

Michael Lobo: पर्यटन खात्‍याने तातडीने उपाययोजना करून जे काही चुकीचे घडले आहे ते दुरुस्‍त करावे, असा सल्ला कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिला आहे.
Published on

पणजी: गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध राज्‍य असले तरी यंदाचा पर्यटन हंगाम मंदीच्या सावटाखाली गेला. विदेशीच नव्‍हे तर देशी पर्यटकांची संख्या देखील मागील आठ महिन्यांत घटली आहे. याचे मुख्‍य कारण म्हणजे विमान प्रवासाचे वाढलेले आणि हॉटेल्सचे महागडे दर होत. अनेक रेस्‍टॉरंट्‌स बंद पडण्‍याच्‍या मार्गावर आहेत.

पर्यटन खात्‍याने तातडीने उपाययोजना करून जे काही चुकीचे घडले आहे ते दुरुस्‍त करावे, असा सल्ला कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिला आहे. पर्यटन व्यवसायातील संबंधित घटकांनाही मंदी प्रकर्षाने जाणवू लागली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राज्यात युरोप, रशिया आणि युक्रेन येथून मोठ्या संख्‍येने पर्यटक येतात. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे यंदा या दोन्ही देशांतील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. विशेषतः युक्रेनमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या शून्यावर आली.

Goa MLA Michael Lobo on tourism slowdown, Goa Tourism News Updates
Goa Tourism: पर्यटकच नाहीत, मग शॅक चालवून काय उपयोग? गोव्यातील व्यावसायिक चिंतेत; देशी पर्यटकांची संख्या घटली

युरोपीय पर्यटकांची संख्‍याही कमी झाली, असे लोबो यांनी नमूद केले. दरम्‍यान, देशातही मंदीचे वातावरण असल्याने गोवा पर्यटनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे, असे आमदार मायकल लोबो यांनी शेवटी नमूद केले.

Goa MLA Michael Lobo on tourism slowdown, Goa Tourism News Updates
Goa Tourism: गोव्याच्या किनाऱ्यांवर शुकशुकाट, समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक पर्यटन हंगाम संपायच्या आधीच बंद

मध्यम गटातील रेस्टॉरंट्सना मोठा फटका

राज्‍यातील काही नावाजलेल्या रेस्टॉरंट्सनी मंदीमुळे आपले व्यवसाय बंद करण्यास सुरवात केली आहे. केवळ उच्चभ्रू गटासाठी असलेली रेस्टॉरंट्स काही प्रमाणात तग धरून आहेत. मात्र मध्यम गटातील अनेक रेस्टॉरंट्स बंद पडण्‍याच्‍या मार्गावर आहेत. गोवा पर्यटन क्षेत्राला सावरण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन आता सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. योग्य नियोजन, नियंत्रित दर आणि सेवा सुधारण्‍यावर भर दिल्यास गोव्याचे पर्यटन पुन्हा बहरू शकते, असा विश्‍‍वास मायकल लोबो यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com