MLA Michael Lobo: प्रादेशिक आराखड्यात घोटाळा नाहीच; लोबोंचा दावा

शंका असल्यास मंत्री राणेंनी चौकशी करावी
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak
Published on
Updated on

मागील प्रादेशिक आराखड्यात कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. सखोल तपासाअंती तो आराखडा लागु करण्यात आलेला आहे अजून तशी शंका असल्यास मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सखोल चौकशी करावी, अशी भूमिका कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मांडली. पर्रा जंक्शन ते नागोवा रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर आमदार लोबो स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलत होते.

‘2011साली तयार करण्यात आलेला प्रादेशिक आराखडा त्याबाबतीत लोकांची मते ऐकून घेण्यासाठी सरकारने जवळपास पाच वर्षे प्रलंबित ठेवला. त्यानंतरच सखोल चौकशीअंती तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात तो लागू झाला होता.

Michael Lobo
Vernekars In Goa : अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्य तिथेच लग्न, वेर्णेकर कुटुंब जपतेय गोवन संस्कृती

मात्र, मंत्री विश्‍वजीत राणे यांना अद्याप त्या आराखड्यात चुका आणि घोटाळा झाल्याचे दिसत असतील तर त्यांनी त्याबाबतीत सखोल चौकशीचे आदेश द्यावेत. आमचा त्याला पाठिंबा राहिल’, असे आमदार लोबो यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत पर्रा गांवचे सरपंच चंदानंद हरमलकर व इतर पंचायत मंडळाचे सदस्य उपस्थित होते. प्रादेशिक आराखडा 2021 मधील सुमारे 6 कोटी चौ.मी. जमिनींचे वसाहतीतून ऑर्चिडमध्ये केलेल्या रूपांतराची चौकशी करण्यासाठी नगर व शहर नियोजन खात्यातर्फे छाननी व चौकशी तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करून यात जो अधिकारी, कर्मचारी गुंतलेला असेल त्याला पुढील विधानसभा अधिवेशनापूर्वी निलंबित केले जाईल, असा इशारा नगर व शहर नियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिला होता. त्यानंतर आज आमदार लोबो यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

Michael Lobo
MLA Michael Lobo: काँग्रेसचे कर्नाटकातील यश हा भाजपसाठी चिंतेचा विषय नाही!

काय म्हणाले होते राणे?

प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये अनेक विसंगती आहेत. त्यामुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. मोठमोठ्या मालमत्ता व वसाहतींच्या जमिनी, काही गरीब लोकांच्या जमिनींचा त्यात समावेश आहे. या जमिनी नैसर्गिक आच्छादन, फळबागा व अविकास उतारांमध्ये रुपांतर करून तर्कशुद्धीकरणाच्या नावाखाली त्यांची जमीन विकसनयोग्य वापरासाठी ठेवण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला आहे, असे नगर व शहर नियोजन खात्याचे मंत्री विश्‍वजीत राणे गुरुवारी म्हणाले होते.

"यापुढे गावोगावच्या आराखड्यात बदल करायचा असेल तर स्थानिक पंचायत मंडळ, स्थानिक जाणकार लोकांना विश्वासात घेऊनच आराखडा तयार करावा कारण. गावची इत्यंभूत माहिती स्थानिक जाणकार लोकांनाच अधिक असते. नवीन आराखडा करताना अशा लोकांचीच मदत घेणे आवश्यक आहे."

मायकल लोबो, आमदार, कळंगुट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com