'कदंब' च्या वाहकाचा प्रामाणिकपणा; बसमध्ये आढळलेले 12 हजार रुपये केले परत

'कदंब' च्या (Kadamba) वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे बसमध्ये हरवलेले रोख 12 हजार रुपये संबंधित वृद्ध महिलेला परत मिळाले आहेत.
Rajendra Gavkar
Rajendra GavkarDainik Gomantak

डिचोली: 'कदंब' च्या (Kadamba) वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे बसमध्ये हरवलेले रोख 12 हजार रुपये संबंधित वृद्ध महिलेला परत मिळाले आहेत. यासंबंधीची माहिती अशी, की ठाणे-डिचोली मार्गावरील कदंब बसमध्ये मंगळवारी सकाळी एक बटवा वजा पिशवी सीटवर पडून असल्याचे बसचे वाहक सदा परवार (Pilgaon-Bicholim) यांच्या निदर्शनास आले. या पिशवीत एका महिलेचा फोटो आणि रोख 12 हजार रुपये होते. वाहक श्री. परवार यांनी बसमधील इतर प्रवाशांना महिलेचा फोटो दाखवला असता, पैसे असलेली ती पिशवी ठाणे येथील वृद्ध महिला रुक्मिणी गावकर या वृद्ध महिलेची असल्याचे एका प्रवाशाने ओळखले. खात्री पटल्यानंतर रुक्मिणी गावकर हिच्याशी संपर्क साधण्यात आला. बस पुन्हा ठाणे गावात गेली.

Rajendra Gavkar
बायणा येथील चार हातगाड्यांवर मुरगाव पालिकेची कारवाई

तेव्हा बसचे चालक राजेंद्र गावकर (Rajendra Gavkar) यांच्या उपस्थितीत वाहक सदा परवार यांनी सदर पैशांची पिशवी रुक्मिणी गावकर हिला परत केली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. पैसे सुरक्षितपणे परत मिळाल्याबद्दल रुक्मिणी गावकर हिने कदंबच्या वाहक आणि चालकाला धन्यवाद दिले आहेत. कदंबच्या वाहकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com