बायणा येथील चार हातगाड्यांवर मुरगाव पालिकेची कारवाई

पालिकाने वास्को पोलिसांच्या (Vasco Police) मदतीने बायणा येथील दुकानात रूपांतर केलेले हातगाड्यामधील सामान जप्त करून, दुकाने सील केली.
बायणा येथे वास्कोचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांच्याशी हुज्जत घालताना दुकानदार
बायणा येथे वास्कोचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांच्याशी हुज्जत घालताना दुकानदारDainik Gomantak

Goa: स्थिर हातगाड्यांचे दुकानात रूपांतर केलेल्या (Hand carts converted into Shops) बायणा येथील चार बेकायदेशीर हातगाड्यावर (Illegal Hand carts) मुरगाव पालिकेकडून (Mormugao) कारवाई करून दुकानातील साहित्य जप्त केले. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांच्या उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली.

बायणा येथे वास्कोचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांच्याशी हुज्जत घालताना दुकानदार
'मुख्यमंत्र्यांसकट भ्रष्टाचारी मंत्र्यांची भाजपने हाकलपट्टी करावी'

वास्को शहरात तसेच इतर भागात बेकायदेशीर गाड्यांना ऊत आला असून मिळेल तिथे आपला व्यवसाय थाटून अतिक्रमणे केली आहेत. यात बिगर गोमंतकीयांचा अधिक भरणा आहे. वास्को रेल्वे स्थानकासमोर म्हणा, भाजी मार्केट, मासळी मार्केट समोर, तसेच नवेवाडे, दाबोळी, बायणा, मुरगाव आदी ठिकाणी बेकायदेशीर गाड्यांना ऊत आला आहे. काही गाडेधारकांनी पालिकेत अजून परवाने देखिल घेतले नाहीत, तर काही परवाना धारकांनी पालिकेची वार्षिक परवाना रक्कम भरली नसल्याने, करोडो रुपयांची थकबाकी पालिकेच्या तिजोरीत येणे बाकी आहे. यात गोवा सहकार भांडार, हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या कंपनीही पालिकेला देणे आहेत.

दरम्यान पालिका सध्या सदर थकबाकी वसुलीसाठी आटापिटा करत असून अनेक गाडेधारकांना त्यांनी थकबाकी वसुलीसाठी धारेवर धरले आहे. दरम्यान अशाच तऱ्हेने आज बायणातील चार दुकानावर पालिकेने कारवाईचा बडगा उचलला. सदर हातगाडे धारकांनी परवानाचा दुरुपयोग करून हातगाड्यांचे दुकानात रूपांतर करून ते या दुकानात बसून व्यवसाय करीत होते. या बेकायदेशीर गाड्यावर कारवाई करण्याचे फर्मान मुख्याधिकार्‍यांनी आज काढले. त्यानुसार पालिका कर्मचारी पोलीस फौजफाट्यासह बायणात त्या बेकायदेशीर गाड्यांवर कारवाई करण्यास गेले असता तेथील वातावरण बरेच तंग बनले.

बायणा येथे वास्कोचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांच्याशी हुज्जत घालताना दुकानदार
मान्द्रेतील डोंगरभागातील जमिनींवर बिगर गोमंतकीयांचे लक्ष

राजकीय दबावापोटी मुरगाव पालिका ही चार दुकाने पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दुकानदारांनी यावेळी केला. पालिकेने यावेळी विध्वंस पथकाला पाचारण केले होते. नंतर दुकानदाराचा रोष पाहून त्या पथकाला परत पाठवण्यात आले. या दुकानांनी सुरवातीला हातगाड्यांचा परवाना घेतला होता तो आता परवाना तसेच तेथेच ठेवून त्या हातगाड्यांचे रूपांतर दुकानात केल्याने पालिका मुख्याधिकार्‍यांनी सदर चार दुकानांवर कारवाई करण्याचा आदेश जारी केला.

त्यानुसार आज पालिका कर्मचारी वास्को पोलिसांच्या मदतीने बायणा मार्केटमध्ये जाऊन या दुकानातील सामान जप्त करून दुकाने सील केली. यावेळी दुकानदाराने वास्को पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्याकडे हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असता, राणे यांनी सदर दुकानदारांना पालिकेच्या कायद्यानुसार त्यांना कारवाई करावीच लागेल, यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असा सल्ला त्यांनी दुकानदारांना दिला व पालिकेला कारवाई करण्यास मोकळीक दिली. त्यानुसार पालिकेने सदर दुकानावर कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com