Curti Panchayat : फोंडा पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रवी नाईकांची यशस्वी चाल

कुर्टी - खांडेपार पंचायत भाजपकडून काबीज; सरपंचावर अविश्‍वास
no-confidence motion against Sarpanch
no-confidence motion against SarpanchDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फोंडा मतदारसंघातील कुर्टी - खांडेपार पंचायत ताब्यात घेण्यात कृषीमंत्री रवी नाईक यशस्वी झाले आहेत. मगो समर्थक कुर्टी - खांडेपार पंचायत सरपंचावर रवी नाईक गटाने अविश्‍वास ठराव आणला आहे, आता हा ठराव संमत होईल तेव्हा होवो, पण पहिल्याच प्रयत्नात रवी यांनी पालिका निवडणुकीवर आपले वर्चस्व ठेवणे सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रभाग 7 व 13 मधील भाजप उमेदवारांना बिनविरोध निवडण्यात रवी नाईक आणि भाजप नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे दोन आले, आता बाकी किमान सहा, अशी सध्याची स्थिती आहे. हे सहा नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपने सध्या रान उठवले आहे, मात्र किती निवडून येतात, ते पहावे लागेल.

no-confidence motion against Sarpanch
Panaji News : सांतिनेजच्या ‘चिखलातून’ महापालिकेचा काढता पाय

पंचायत निवडणुकीत कुर्टी - खांडेपार पंचायतीत मगो व काँग्रेस समर्थक गट सत्तारूढ झाला होता. त्यावेळेला रवी नाईक सोबत कार्यकर्तेही भाजपात प्रवेश केल्यानंतर जॉन परेरा यांनी काँग्रेससोबत राहणे पसंत केले होते. पण पंचायत निवडणुकीत विल्मा निवडून आल्यानंतर रवी यांच्याशी जॉन व विल्मा परेरा यांची चर्चा झाली, पण ती फिसकटली.

त्यामुळे एका पंचामुळे मगो आणि काँग्रेस समर्थक गट सत्तारूढ झाला. मगोचे नावेद तहसीलदार सरपंच तर काँग्रेसच्या विल्मा उपसरपंच अशी वर्णी लागली. वास्तविक तेव्हाच रवींना ही पंचायत घेता आली असती, पण रवींनी दुर्लक्ष केले होते.

no-confidence motion against Sarpanch
Ponda Municipal Council Elections 2023: प्रभाग 15 ची अवस्था ‘असुनी नाथ, मी अनाथ’; विद्यमान नगरसेविका हॅट्ट्रिक साधणार ?

रवींचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध !

अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही स्थितीत रवी नाईक राजकारणात टिकून राहिले आहेत. त्यामुळेच यावेळेला प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार विश्‍वनाथ दळवी यांच्याविरोधातील भारत पुरोहित या एकमेव प्रतिस्पर्धी उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी रवींनी प्रयत्न केले आणि त्याला यश आले, त्यामुळे प्रभाग क्र.सात बिनविरोध झाला.

खुद्द भारत पुरोहित यांनी आपण केवळ रवी नाईक यांच्या सांगण्यानुसारच उमेदवारी मागे घेतली, असे स्पष्ट केले आहे. तर प्रभाग 13 मधील विद्या पुनाळेकर यांना बिनविरोध निवडून आणण्यात भाजप नेत्यांनी प्रयत्न केले. त्याला रवींनी सहकार्य केले, त्यामुळे रवींचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com