Goa Land Price: गोव्यात श्रीमंतांना हवीये 'जागा'; मागणी वाढताच किंमतीसंदर्भात सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak

Goa Land Price: गोव्यात श्रीमंतांना हवीये 'जागा'; मागणी वाढताच किंमतीसंदर्भात सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Property Value Increase In Goa 2024: राज्यातील जमिनीच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने ठोस पावले उचलली आहेत. चार वर्षानंतर महसूल खात्याने अखेर यासाठी समिती गठित केली आहे.
Published on

राज्यातील जमिनीच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने ठोस पावले उचलली आहेत. चार वर्षानंतर महसूल खात्याने अखेर यासाठी समिती गठित केली आहे. गोव्यातील जमिनींमध्ये इतर राज्यांतील श्रीमंत व्यक्तींकडून सुरु असलेल्या गुंतवणीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल सरकारकडून घेतल्याने याकडे लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान, सरकारी तिजोरीला अतिरिक्त महसूल मिळवण्याच्या प्रयत्नांसोबत, व्यवसाय सुलभ करण्यासाठी सरकार नोंदणी विभागात सुधारणा करु इच्छित आहे. गोवा सरकारला जमिनीच्या विविध श्रेणी आणि बांधकाम झालेल्या जमिनींच्या दरांसाठी पूर्वी अधिसूचित केलेल्या आधारभूत किंमत निर्धारण, विश्लेषण आणि सुधारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आनंद होत असल्याचे महसूल खात्याच्या अप्पर सचिव वृषिका कवठणकर यांनी जाहीर केले.

Goa Land Price: गोव्यात श्रीमंतांना हवीये 'जागा'; मागणी वाढताच किंमतीसंदर्भात सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
Goa News: पेडण्यात जुनी इमारत कोसळली; वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला!

समितीची कालावधी दोन वर्षांची असणार असून प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक तिमाहीत एकदा भेटेल. समितीवर 13 सदस्य असणार असून विशेष निमंत्रित सदस्यांसाठी जागा रिक्त ठेवल्या गेल्या आहे.

गोव्यातील 12 तालुक्यांपैकी बार्देश, तिसवाडी, सासष्टी, मुरगाव आणि पेडणेमध्ये जवळपास दोन लाख जमिनींचा व्यवहार एका वर्षात झाल्याची माहिती समोर आली आहे. बार्देशमध्ये 36 हजार हून अधिक जमिनीचे सौदे झाले आहे. आधारभूत किंमतीत वाढ करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे सरकारी महसुलात वाढ असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पेडणेतील (Pernem) जमिनीची आधारभूत किंमत 1,500 प्रति चौ.मी. केली होती, तर कमाल किंमत 15 हजार चौ.मी. ठेवली होती. बार्देशमध्ये 4 हजार चौ.मी. वर सुरु होऊन 25 हजार चौ.मी. पर्यंत, तर पेडणे तालुक्यातील किंमतीत बदल केलेला नाही.

Goa Land Price: गोव्यात श्रीमंतांना हवीये 'जागा'; मागणी वाढताच किंमतीसंदर्भात सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
Goa News: गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

निर्णयावर नाराजी वाढणार

गोव्यातील जमिनी परप्रांतीयाना विक्री केल्या जात असल्यावरुन विविध ठिकाणी आंदोलन होत असताना सरकारच्या या निर्णायामुळे आणखी नाराजी वाढण्याची शक्यता आहे. आपल्याच राज्यात गोवेकरांना चांगले घर घेणे अशक्य झाल्याने आधारभूत किंमतीत वाढीच्या निर्णयामुळे सरकारसाठी आणखी अडचणी निर्माण करणार असल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com