Goa News: पेडण्यात जुनी इमारत कोसळली; वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला!

पेडणे शहरातील पोर्तुगीजकालीन एक मजली इमारतीचा एका बाजूचा भाग आज (11 ऑक्टोबर) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोसळला.
Goa News: पेडण्यात जुनी इमारत कोसळली; वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला!
An old building collapsed in Pernem but there was no loss of lifeDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे शहरातील पोर्तुगीजकालीन एक मजली इमारतीचा एका बाजूचा भाग आज (11 ऑक्टोबर) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोसळला. पेडणे ते म्हापसा मार्गावरील रस्त्याजवळ तसेच पेडणे बाजारात जाणाऱ्या एक अंतर्गत रस्त्याजवळ ही इमारत असून या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. या दोन्ही मार्गावर ही इमारत कोसळली. पण सुदैवाने त्यावेळी या दोन्ही मार्गावर एकही वाहन वा व्यक्ती रस्त्यावर नव्हते, त्यामुळे अनर्थ टळला.

इमारत कोसळल्यावर मोठा आवाज झाल्यावर आजूबाजूच्या लोकांनी येथे धाव घेतली.इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पेडण्याचे उपजिल्हाधिकारी नाईक पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी ,पेडणे पोलिस व वाहतूक पोलिस ,पेडणे वीज खात्याचे अभियंते यांनी घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक उपाययोजना केली.

Goa News: पेडण्यात जुनी इमारत कोसळली; वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला!
Goa Crime News: अट्टल गुन्हेगार मारियासह दोघेजण गजाआड! पर्वरी पोलिसांची धडक कारवाई; संशयितांना 6 दिवसांची कोठडी

इमारतीचा एका बाजूचा हा मोठा भाग पेडणे म्हापसा मार्गावर व पेडणे बाजारात गेलेल्या अंतर्गत रस्त्यावर कोसळल्याने हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी नाईक यांनी खास आदेश देऊन रस्त्यावरील हे दगड व मातीचे ढिगारे हटवण्याचा आदेश दिल्यावर जेसीबीद्वारे ढिगारे हलवण्यास सुरवात झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com