शिवोली : मार्ना-शिवोली (Marna-Shivoli) येथील मुख्य रस्ता (road) सध्या शेवटच्या घटका मोजत असून या भागातून नियमित पणे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सध्या चंद्रावरील खडकाळ प्रदेशातून वाहने हाकत असल्याचा भयंकर अनुभव येत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, पूर्णपणे उखडलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढतांना अनेक दुचाकी चालक अपघातात (Accident) सापडल्याने सध्या रुग्णालयात (hospital) उपचार घेत असून खडड्यांमुळे खिळखीळी झालेली चारचाकी वाहने गेरेजमध्ये विसावा घेत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पातील एक असलेल्या तिळारी प्रकल्पालीत पाण्याचासाठा बार्देशातील लोकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवोलीचे आमदार तथा माजी जलसंपदा मंत्री असलेल्या विनोद पालयेंकर यांच्या अथक प्रयत्नांनंतर याभागात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सुरुवात सुमारे दोन वर्षाआधीच सुरू झाली होती. दरम्यानच्या काळात कोवीड महामारीच्या पार्श्वभूमीवर 25 मार्च 2020 पासून राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आल्याने परराज्यातील कामगार तसेच तंत्रज्ञ आपापल्या गांवी निघून गेल्यामुळे याकामात मोठ्या प्रमाणात खंड पडला.
नंतरच्या काळात येथील नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पुन्हां सुरू करण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राज्यात कर्फ्यु जारी करण्यात आला, त्यामुळे आधीच रेंगाळलेले अधिकच ताणले गेल्यामुळे यंदाच्या पावसाळ्याआधी पुर्णत्वास यावयाचे सदरचे काम अद्याप अपुर्णावस्थेत असल्याची कबुली खुद्द विनोद पालयेंकर यानीच दै. गोमन्तकच्या स्थानिक प्रतिनिधीशी बोलतांना दिली. कारण काहीही असो सध्या मार्ना शिवोली ते म्हापसा आणी शिवोली ते आंसगांव पंचक्रोशीकडे जाणारा रस्ता म्रुत्यूचा सापळा बनल्याचे याभागाचा दौरा केला असतां दिसून आले. दरम्यान, गेल्या महिन्याभरात राज्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे येथील रस्त्याची पार दुर्दशा झाल्याचे लक्षात घेत याभागात एखाद्या वाहधचालख अथवा पादचार्याचा बळी जाण्यापूर्वीच निदान पावसापुरती रस्त्यांची डागडुजी करण्याचा निर्णय स्थानिक आमदार विनोद पालयेंकर यांनी घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.