Film City In Goa: लोलयेत फिल्मसिटीचा मार्ग मोकळा

Film City In Goa: भगवती पठारावर जमीन देऊ: कोमुनिदाद भागधारकांचा ठराव
Goa Film City
Goa Film City Dainik Gomantak
Published on
Updated on

Film City In Goa: लोलये कोमुनिदादच्या आज झालेल्या भागधारकांच्या बैठकीत गोवा मनोरंजन सोसायटीला फिल्मसिटीसाठी भगवती पठारावर जमीन देण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला, असे लोलये कोमुनिदाद संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत वारीक यांनी सांगितले.

या बैठकीला 54 भागधारक उपस्थित होते. त्यापैकी एकाच कुटुंबातील चार भागधारकांनी ठरावाला विरोध दर्शविला. मात्र, बहुमताने गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी लोलये कोमुनिदाद संस्थेच्या भागधारकांनी हा ठराव बहुमताने संमत केल्याचे वारीक यांनी सांगितले. यापूर्वी लोलये कोमुनिदाद संस्थेची बैठक आणि पंचायतीची ग्रामसभा एकाच दिवशी बोलाविल्याने त्या निर्णयाला काही ग्रामस्थांसह कोमुनिदाद संस्थेच्या काही भागधारकांनी आक्षेप घेतला होता.

त्यानुसार लोलये-पोळे पंचायतीने रविवारी (ता.४) सकाळी १० वाजता निश्चित केलेली ग्रामसभा पुढे ढकलली. तरीही १२८ पैकी फक्त ५४ भागधारक बैठकीला उपस्थित राहिले. २५० एकर जमीन ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर फिल्मसिटी उभारण्यासाठी मनोरंजन सोसायटीला देण्याचे कोमुनिदादच्या गेल्या बैठकीत ठरले होते.

Goa Film City
Lok Sabha Election: मगोपचा भाजपला पाठिंबा; समित्या बरखास्त

...म्हणून विरोधकांना आला संशय

लोलये कोमुनिदाद संस्थेची बैठक सकाळी 10.30 वाजता सुरू झाली, तर लोलयेची ग्रामसभा रविवारी त्याच दिवशी व त्याच वेळी बोलाविल्याने भगवती पठारावर फिल्मसिटीला पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करणाऱ्यांमध्ये संशय निर्माण झाला होता.

त्यामुळे ग्रामसभा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली होती. एकाच दिवशी एकाच गावात फिल्मसिटीसारखा संवेदनशील विषय असताना ग्रामसभा कशी बोलाविता, असा आक्षेप कोमुनिदादचे भागधारक ओम प्रभू गावकर यांनी घेतला होता.

Goa Film City
PM Narendra Modi: मोदींच्या सभेसाठी जुनाट वृक्षांची तोड

यापूर्वी लोलये कोमुनिदाद संस्थेची बैठक आणि पंचायतीची ग्रामसभा एकाच दिवशी बोलाविल्याने त्या निर्णयाला काही ग्रामस्थांसह कोमुनिदाद संस्थेच्या काही भागधारकांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार लोलये-पोळे पंचायतीने रविवारी (ता.४) सकाळी 10 वाजता निश्चित केलेली ग्रामसभा पुढे ढकलली. तरीही 128 पैकी फक्त 54 भागधारक बैठकीला उपस्थित राहिले. २५० एकर जमीन ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर फिल्मसिटी उभारण्यासाठी मनोरंजन सोसायटीला देण्याचे कोमुनिदादच्या गेल्या बैठकीत ठरले होते.

...म्हणून विरोधकांना आला संशय

लोलये कोमुनिदाद संस्थेची बैठक सकाळी १०.३० वाजता सुरू झाली, तर लोलयेची ग्रामसभा रविवारी त्याच दिवशी व त्याच वेळी बोलाविल्याने भगवती पठारावर फिल्मसिटीला पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करणाऱ्यांमध्ये संशय निर्माण झाला होता. त्यामुळे ग्रामसभा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली होती. एकाच दिवशी एकाच गावात फिल्मसिटीसारखा संवेदनशील विषय असताना ग्रामसभा कशी बोलाविता, असा आक्षेप कोमुनिदादचे भागधारक ओम प्रभू गावकर यांनी घेतला होता.

शांततेत रॅली काढून फिल्मसिटीला विरोध

लोलये कोमुनिदाद संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीच्या पार्श्वभूमीवर लोलये ग्रामस्थांनी भगवती पठारावर होऊ घातलेल्या फिल्मसिटी व अन्य प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आज लोलयेत शांततेत रॅली काढून निषेध नोंदविला. ही रॅली लोलये येथील जैवसंवेदनशील भगवती पठारावर फिल्मसिटी व अन्य प्रकल्प नको, या मागणीसाठी काढली होती, असे लोलये ग्रामपंचायतीच्या जैवविविधता समितीचे अध्यक्ष मनोज प्रभुगावकर यांनी सांगितले. या रॅलीत लोलये गावातील सुमारे १५० ग्रामस्थांनी भाग घेतला.

‘विन्ड मिल पार्क’चा विषय गुलदस्त्यात

लोलये कोमुदादीने 494 एकर जमीन विन्ड मिल पार्क सुरू करण्यासाठी डब्ल्यूएसएफ या कंपनीला भाडे पट्टीवर जागा देण्याचे गेल्या बैठकीत ठरविले होते. मात्र, त्या कंपनीकडून अद्याप कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने आजच्या बैठकीत हा विषय ठेवण्यात आला नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com