Bicholim News: साष्टीवाडा-तिखाजनपर्यंतच्या बगलमार्गाने वाहतूक कोंडीची समस्या सुटणार- प्रेमेंद्र शेट

ग्रामस्थांचे सहकार्य ः आमदार शेट यांच्याकडून अधिकाऱ्यांसमवेत पाहणी
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून मये पंचायत क्षेत्रातील साष्टीवाडा ते तिखाजनपर्यंत बगलमार्ग बांधण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला अनुसरून शनिवारी (ता.4) मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी डिचोलीचे मामलेदार यांच्यासह बगलमार्गासाठी निश्चित केलेल्या नियोजित जागेची पाहणी केली. बगलमार्ग कशा पद्धतीने बांधता येणार, त्याचा आढावाही आमदारांनी घेतला.

यावेळी मये पंचायतीचे तलाठी तसेच वायंगिणीचे पंच वासुदेव गावकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास हा प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे प्रेमेंद्र यांनी म्हटले आहे. ज्या जागेतून बगलमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. ती जागा देवीच्या कळसाची पारंपरिक वाट आहे.

Bicholim News
Goa Beach: किनारी भागात बेकायदा लाकडी पलंग

मये गावातून तिखाजनला जाताना अरुंद रस्ता आणि रस्त्याला टेकून असलेल्या घरांमुळे भावकई, वायंगिणी आणि तिखाजन येथे वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. बऱ्याचदा तासनतास वाहने आणि प्रवासी अडकून पडतात.

त्यामुळे मोठी गैरसोय निर्माण होत असते. त्यातच रस्त्याला टेकून घरे असल्याने अपघाताचा धोकाही असतो. या समस्येवर मात करण्यासाठी साष्टीवाडा ते तिखाजनपर्यंत बगलमार्ग काढण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून विचाराधीन आहे.

Bicholim News
Porvorim News: चोडण-बिठ्ठोण पुलाला होतोय कडाडून विरोध

साष्टीवाडा ते तिखाजनपर्यंत बगलमार्ग झाल्यास वायंगिणी, तिखाजन येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. त्याशिवाय कळसोत्सव काळात मये गावातून देवीचा कळस साष्टीवाडा येथून काजू बागायतीतून वायांगिणी येथील श्री खेतोबा मंदिरात जात असतो. बगलमार्ग झाल्यास देवीचा कळस सुरळीतपणे नेणे शक्य होणार आहे.

- प्रेमेंद्र शेट, आमदार,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com