Porvorim News: चोडण-बिठ्ठोण पुलाला होतोय कडाडून विरोध

साल्वादोर-द-मुन्‍द ग्रामसभा तापली : रस्‍ता रुंदीकरणावेळी घरे जाण्‍याची ग्रामस्‍थांना भीती
Porvorim News
Porvorim NewsDainik Gomantak

साल्वादोर-द-मुन्‍द पंचायतीच्या ग्रामसभेत चोडण-बिठ्ठोण यादरम्‍यान बांधल्‍या जाणाऱ्या पुलास ग्रामस्‍थांनी तीव्र विरोध दर्शविला. सरपंच रोशनी सावईकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्‍या या ग्रामसभेत इतर महत्त्‍वाच्‍या विषयांवरही यावेळी चर्चा झाली.

चोडण-बिठ्ठोण पुलाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी ही खास ग्रामसभा घेण्‍याची मागणी सरपंचांकडे केली होती. सदर पूल झाल्यास हा मुख्य रस्ता बनणार आहे. सध्या रस्त्याची रुंदी कमी असून मुख्य रस्ता बनल्यास वाहतूक समस्या वाढेल.

त्‍यावर तोडगा काढण्‍यासाठी ग्रामस्थांची घरे, संरक्षक भिंती पाडाव्‍या लागतील. यासाठी काही नुकसान भरपाईही दिली जाणार नाही. या पुलाचा गावातील लोकांना काहीच उपयोग नाही, उलट संपूर्ण गावाला याचा मन:स्ताप होऊन नुकसानही बरेच होणार आहे, असे ग्रामस्‍थांनी सांगितले.

सदर पुलाबाबतचे ग्रामस्थांमधील गैरसमज दूर करण्यासाठी सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना गावात पाठवावे, अशी मागणी पंचायत एसडीएमने केली होती. परंतु सरकारकडून कोणतीच पावले उचलली गेली असल्‍याचे ग्रामस्थ दिनेश डायस यांनी सांगितले.

Porvorim News
Goa Beach: किनारी भागात बेकायदा लाकडी पलंग

अन्‍य महत्त्‍वपूर्ण विषयांवर झाली चर्चा

धनवाडो येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक गरजेचा बनला आहे. गावात इंटरनेट कनेक्शनही व्यवस्थित मिळत नाहीय. त्यासाठी एक कॅम्प करावा व ही सुविधा पंचायतीतच उपलब्‍ध करून द्यावी. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कपेल बसस्टॉपजवळ ‘नो पार्किंग झोन’ करावा अशीही मागणी करण्यात आली. त्यावर विजय दळवी यांनी तो ‘नो पार्किंग झोन’ यापूर्वी झाला असून पोलिसांनी कारवाई केली पाहिजे असे सांगितले.

काही गतिरोधकांना रंग लावण्‍यात आलेला नाही. त्‍यामुळे अपघाताची भीती व्‍यक्त केली जात आहे. दुसरीकडे काही समाजविरोधक घटक उघड्यावर दारू पिऊन बाटल्या अस्ताव्यस्त फेकत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी.

अंदाजपत्रकावरही चर्चा झाली. गावात सिनेमा किंवा मालिकांचे चित्रीकरण झाले तर पंचायतीला महसूल मिळावा म्‍हणून त्‍यांना शुल्‍क वापरावे, असा ठरावही संमत करण्यात आला. जोसेफ पिंटो, ब्रिगेडियर ब्रागांझा, विजय चोडणकर, प्रमेश नाईक, नेले व अन्‍य ग्रामस्थानी या चर्चेत सहभाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com