राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या गोवा, कर्नाटक, झारखंडच्या दौऱ्यावर; कारवार बंदरातून करणार पाणबुडी सफर

President Droupadi Murmu Goa, Karnataka and Jharkhand Visit: राष्ट्रपती मुर्मू ३० डिसेंबर रोजी झारखंड येथील गुमला आंतरराष्ट्रीय समागम सोहळ्यात सहभागी होतील.
President Droupadi Murmu Goa, Karnataka and Jharkhand Visit
President of India, Droupadi MurmuDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या गोवा, कर्नाटक आणि झारखंडच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुर्मू या दौऱ्याच्या कालावधीत विविध कार्यक्रमात सहभाग घेतील. त्या कारवार येथील बंदरातून पाणबुडी सफर देखील करणार आहेत.

पीआयबीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, राष्ट्रपती मुर्मू २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत गोवा, कर्नाटक आणि झारखंड राज्यांना भेट देतील. २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी त्या गोव्यासाठी रवाना होतील. २८ डिसेंबर रोजी त्या कर्नाटकच्या कारवार येथील बंदरात दाखल होतील. या बंदरात त्या बाणबुडीतून सागरी सफर करणार आहेत.

President Droupadi Murmu Goa, Karnataka and Jharkhand Visit
"नाईटक्लबच्या दुर्घटनेतील बळी ही तर देशाची हानी"! न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केला शोक; ड्रग्जपासून दूर राहण्याचे तरुणांना केले आवाहन

२९ डिसेंबर रोजी राष्ट्रपती मुर्मू झारखंडमधील जमशेदपूर येथे हजेरी लावतील. येथील ओल चिकीच्या शताब्दी सोहळ्यात त्या उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी त्या एनआयटीच्या १५ व्या दीक्षांत समारंभालाही संबोधित करतील.

President Droupadi Murmu Goa, Karnataka and Jharkhand Visit
Goa Nightclub Fire: 'मै दिल्लीमे था, हमे कुछभी मालूम नहीं'! नाईटक्लब दुर्घटनेप्रकरणी जामीन मंजूर झाल्यावर संशयिताची प्रतिक्रिया

राष्ट्रपती मुर्मू ३० डिसेंबर रोजी झारखंड येथील गुमला आंतरराष्ट्रीय समागम सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात त्या कार्तिक यात्रा कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे गोव्यात ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. २७ आणि २८ डिसेंबर रोजी एरियल व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीवर बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com