Goa Education: त्रिवेणी संगमातूनच घडते विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व; आमदार डाॅ. दिव्या राणे

Goa Education: ठाणे विद्यालयातर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा सन्मान
Goa Education
Goa EducationDainik Gomantak

Goa Education: विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा ‘त्रिवेणी संगम’ व्हावा लागतो. आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील मुलांनी उंच भरारी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन पर्ये मतदारसंघाच्या आमदार तथा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डाॅ. दिव्या राणे यांनी केले.

Goa Education
Goa Accident Case: होंड्यातील अपघातात वेळगेचा युवक ठार

कै. हिरोजीराव बाबूराव देसाई सरकारी माध्यमिक विद्यालय ठाणे येथे शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच शिक्षकवर्गाच्या गुणगौरव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डाॅ. दिव्या राणे बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, डोंगुर्ली-ठाणे पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर, संजय भंडारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ नाईक, एस.एम.सी. अध्यक्ष फटगो गावकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल देसाई, ज्येष्ठ शिक्षक गणेश गावडे, पत्रकार उदय सावंत तसेच उपसरपंच तनया गावकर, नीलेश परवार, सुरेश आयकर, विनायक गावस, सुचिता गावकर, सुभाष गावकर, उपाध्यक्ष पांडुरंग गावकर, उत्तम गावकर, गोपाळ नाईक, सुहास नाईक, सुंदर सावंत, स्मिता कदम, शकुंतला सावर्शेकर, गुरुदास गावस आदींची उपस्थिती होती.

Goa Education
Goa Congress: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे मोठा भ्रष्टाचारच : काँग्रेसचा आरोप

यावेळी दहावी परीक्षेत शाळेत प्रथम आलेली तृप्ती गावकर, प्रज्योत पर्येकर, संजना गावस, गौरक्षा पालकर, तन्वी सावंत, सुजय चोर्लेकर, समीक्षा लाड, सावली गावस, विशाखा गावकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शाळेतील कर्मचारीवर्गांचाही यावेळी आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजा नाईक यांनी केले. स्वागत काशिनाथ नाईक तर गणेश गावडे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.

आज ठाणे विद्यालयाची मॉडर्न विद्यालय म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे आता शिक्षकांबरोबर पालक व विद्यार्थ्यांची जबाबदारीही वाढलेली आहे. मुलांना संधी आहे. त्या संधीचा फायदा त्यांनी करून घेतला पाहिजे. यासाठी आमचा सदैव पाठिंबा राहणार आहे.

- डाॅ. दिव्या राणे, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com