राज्यातील जनतेनं सोलर वीज यंत्राचा वापर करावा: वीजमंत्री काब्राल

तसेच आस्थापनात सरकारी अनुदानस्वरुप मिळणाऱ्या सोलार वीज यंत्रणेचा (electrical system) लाभ करून घेण्याचे आवाहन वीजमंत्री निलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी कळंगुटात केले.
आराडी-कळंगुट येथे नवीन  वीज उपकेद्राच्या केद्राची पायाभरणी समारंभात समई प्रज्वलीत करतांना वीजमंत्री निलेश काब्राल
आराडी-कळंगुट येथे नवीन  वीज उपकेद्राच्या केद्राची पायाभरणी समारंभात समई प्रज्वलीत करतांना वीजमंत्री निलेश काब्रालDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील विविध भागात वीज भुमीगत (Electric underground), वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे  विशेष करून किनारी भागातील वीज वाहिन्या टाकण्याचे चाळीस टक्के काम आतापर्यंत  पुर्ण झालेले आहे. भविष्यात  स्थानिक लोकांनी स्वताच्या घरात तसेच आस्थापनात सरकारी अनुदानस्वरुप मिळणाऱ्या सोलार वीज यंत्रणेचा (electrical system) लाभ करून घेण्याचे आवाहन वीजमंत्री निलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी कळंगुटात केले. (The people of the state should use solar power system)

दरम्यान, राज्यातील कांही भागात होणाऱ्या वीज चोरीचे प्रकार  रोखण्यासाठी नवीन स्मार्ट मिटर योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  आराडी कळंगुट येथे नव्याने उभारण्यात  येणाऱ्या वीज उपकेद्राची पायाभरणी केल्यानंतर मंत्री काब्राल बोलत होते. दरम्यान, येथील  उपकेद्रातील वीज यंत्रणा कार्यान्वित झाल्यास येत्या वीस वर्षापर्यत याभागात वीजेची समस्या राहाणार नसल्याचे त्यांनी आश्वासन दिले. 

सांळगावात येत्या एक दोन वर्षात बहुउद्देशीत वीज प्रकल्प उभा राहाणार असल्याचेही मंत्री काब्राल यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो, सरपंच शॉन मार्टीन्स, कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नाडीस, वीज अभियंता रेड्डी, माजी सरपंच फ्रान्सिस्को रॉड्रीगीश तसेच मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रांमस्थ उपस्थित होते. 

आराडी-कळंगुट येथे नवीन  वीज उपकेद्राच्या केद्राची पायाभरणी समारंभात समई प्रज्वलीत करतांना वीजमंत्री निलेश काब्राल
Goa: स्वयंपूर्ण पंचायतींचा होणार गौरव; पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

दरम्यान,  कोवीड महामारीचा काळात दोन वर्षापुर्वी नियोजित करण्यात आलेल्या, आराडी-कळंगुट येथील नव्या वीज उप केद्राच्या उभारणीसाठी दोन कोटी चौतीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल वीज मंत्री काब्राल यांचे आभार मानले तसेच येथील केद्रासाठी कोमुनिदादची जमीन अत्यल्प दरांत मिळवून दिल्याबदद्ल स्थानिक एलन पिंटो कुटुंबीयांचे आभार मानले.  सरपंच शॉन मार्टीन्स यांनी यापुढे वीज समस्येवरून पंचायत मंडळाला लोकांच्या रोषास सामोरे जावे लागणार नसल्याचे सांगितले तसेच हल्लीच कळंगुटसहित राज्याला  बसलेल्या तौक्ते वादळाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी स्थानिक वीज कर्मचारी तसेच पंचायत मंडळ आणी खुद्द मंत्री मायकल लोबो यांनी घेतलेल्या कष्टाची उपस्थितांना माहिती करून दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com