Padma Shri award : 'मिळालेला पद्मश्री पुरस्कार पुरस्कार हा संबंध गोव्याचा'

अध्यात्माचा स्वीकार करा : पद्मश्री ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी
Padma Shri Bramheshanandacharya Swami
Padma Shri Bramheshanandacharya Swamidainik gomantak
Published on
Updated on

वास्को : भारत सरकारद्वारे गोव्याच्या आध्यात्मिक क्षेत्रात कार्याबद्दल मिळालेला पुरस्कार हा संबंध गोव्याचा तसेच गोवेकरांचा आहे. गोव्याची जी आध्यात्मिक शक्ती दाबून राहिलेली होती तिला आज पुनर्जीवन देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वर काढले आहे. याचा मला आनंद आहे. हे क्षेत्र कसलाच राजकीय पक्ष तसेच इतर भेदभाव न करता कार्यान्वित आहे. सगळ्यांनी अध्यात्माचा स्वीकार करावा असे आवाहनही पद्मश्री ब्रम्हेशानंदाचार्य स्वामिंनी केले. (The Padma Shri award is for the whole of Goa as well as the people of Goa says Padma Shri Bramheshanandacharya Swami)

पद्मश्री धर्मभूषण सद्गुरु ब्रम्हेशानंदाचार्य स्वामींचे आज संध्याकाळी गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या स्वागतार्थ वास्कोचे (Vasco) आमदार दाजी साळसकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर तसेच पद्मनाभ सांप्रदायाचे शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Padma Shri Bramheshanandacharya Swami
pre-monsoon : वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांचा आढावा

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारद्वारे गोव्याच्या आध्यात्मिक क्षेत्रात कार्याबद्दल धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींना पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Award) घोषित करण्यात आला होता. २८ मार्च रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ramnath kovind) यांच्या हस्ते स्वामीजींना पद्मश्री पुरस्कार २०२२ राष्ट्रपती भवन दिल्ली (Rashtrapati Bhavan, Delhi) येथे प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास उपराष्ट्रपती एम. व्यकय्या, सविता कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा तसेच विविध प्रतिष्ठित महनीय मान्यवरांसह श्री. दत्त पद्मनाभ पीठ संचालिक अँड्. ब्राह्मीदेवी, महाप्रबंधक शुभक्षण नाईक, शशिकांत केरकर, रमेश फडते, विश्वजीत गावस उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com