pre-monsoon : वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांचा आढावा

आमदार दाजी साळकर यांचे पावसाळ्यापूर्वी योग्य ती उचित पावले उचलण्याचे निर्देश
Vasco MLA Daji Salkar
Vasco MLA Daji Salkardainik gomantak
Published on
Updated on

वास्को : वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी विविध संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला व पावसाळ्यापूर्वी योग्य ती उचित पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. (Vasco MLA Daji Salkar reviews pre-monsoon works)

पावसाळा सुरू व्हायला दोन महिने बाकी आहेत. तसेच पावसाळ्यात वास्को शहरा बरोबर इतर भागांना यात बायणा, वाडे ठिकाणी पूरस्थिती उद्भवते व याचा वाहन चालका बरोबर इतर जनतेला, दुकानदारांना, घरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड, वीज तारा तुटून पडणे आदी मोठ्या समस्या उद्भवतात याची सर्वांना प्रचिती आहे.

दरम्यान या समस्यांचे निवारण करण्यासाठी तसेच पावसाळ्यात उद्भवणार्‍या सदर समस्यावर आपण कोणती उपाययोजना आखून समस्यांचे निवारण करू शकतो याविषयी मान्सूनपूर्व (Pre-monsoon) कामाचा आढावा घेण्यासाठी वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी रवींद्र भवन बायणा येथे संबंधित शासकीय अधिकार्‍यांची बैठक बोलावून, त्यांना त्या त्या कामाविषयी निर्देश देण्यात आले.

Vasco MLA Daji Salkar
मुरगाव पालिका मंडळाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

रवींद्र भवन येथे घेण्यात आलेल्या सदर बैठकीस आमदार दाजी साळकर यांच्या बरोबर मुरगाव (Margao) तालुक्याचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस देसाई, मामलेदार रघुनाथ देसाई, मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर, वीज खात्याचे संयुक्त अभियंते संजीव म्हाळसेकर, आरोग्य खात्याचे डॉक्टर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वास्को अग्निशमन दल, पालिका अधिकारी व कामगार पर्यवेक्षक व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वास्कोचे आमदार दाजी साळकर तसेच उपजिल्हाधिकारी यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून या बैठकीत विचारविनिमय केला. याविषयी बोलताना आमदार साळकर म्हणाले की आपण मागच्या कार्यकाळात तीन वेळा वास्को (Vasco) शहर प्रभागाचे नगरसेवक म्हणून कार्यरत होतो. या काळात मी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या विषयी ज्ञात आहे. आता आमदार या नात्याने मी वास्को शहरात पावसाळ्यात उद्भवणार्‍या समस्यांचे निवारण संबंधित मंत्री महोदयांच्या सहाय्याने निवारण करणार असल्याचे ते म्हणाले.

Vasco MLA Daji Salkar
शाळा पाडल्या; मात्र राष्ट्रीय चक्रीवादळ धोका उपशमन प्रकल्प अपूर्णच

या विषयी आजच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली आहे. यापूर्वी त्यांनी कामात कसलीही तडजोड न करता माझ्या नगरसेवक कार्यकाळात भरपूर सहकार्य केल्याचे ते म्हणाले. सोमवारपासून शहरातील (City) मुख्य नाल्यांची साफसफाई चे काम सुरू करणार असून पालिका मुख्याध्यापक मुख्याधिकारी जयंत तारे यांनी या कामि लक्ष घालून नाल्यांची साफसफाई करून घेणार असल्याचे सांगितले.

तसेच सध्या रेल्वे दुपदरीकरण विस्ताराचे काम चालू असून रेल्वेने (Railway) मातीचा भराव टाकून काही नाल्यांची वाट बंद झाली आहे. त्यांनाही सदर वाट मोकळी करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच डोंगराळ भागातून येणाऱ्या पावसाचे पाणी सखल भागात डुंबत असल्याने त्याचा योग्यरीत्या निचरा होत नाही. या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची मुख्य वाट व्यवस्थित उघडुन देण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.

Vasco MLA Daji Salkar
खूशखबर..! गोवा डेअरीकडून दूध उत्पादकांना गुढी पाडव्याची भेट

या वेळी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria) या रोगावर उपाय योजना आखण्यासाठी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडे (Doctor) विचारविनिमय झाला. यावर त्यांनी उद्भवणाऱ्या समस्यावर प्रकाश टाकून त्या आमदाराच्या नजरेस आणून दिल्या. आमदार (MLA) साळकर यांनी या काळात लागणाऱ्या औषधांचा तुटवडा भासणार नाही याकडे लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले.

पावसाळ्यात (Rain) उद्भवणाऱ्या वीज समस्येचीही यावेळी विचारविनिमय झाला. यावर वीज अभियंता म्हाळसेकर यांनी पावसाळ्यात समस्या उद्भवू नये यासाठी वीज खात्याचे कर्मचारी दक्षता घेत असून काम चालू असल्याचे ते म्हणाले.

पालिका कामगार पर्यवेक्षकांनीही आपल्या समस्या मांडून त्यांचे निवारण करण्याची मागणी केली. तसेच पालिकेची कचरा वाहने नादुरुस्त असतात हे मुख्याधिकारी तारी यांच्या लक्षात आणून दिले. आता पंधरा दिवसांनी परत बैठक बोलावून कामाचा आढावा घेणार असल्याचे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com