खासगी बसेसची मालकी ‘कदंब’कडे देणार नाहीच : सुदीप ताम्हणकर

आपल्या मनानेच मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत
Goa News | Sudip Tamhankar
Goa News | Sudip TamhankarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राज्यातील सर्व खासगी बसेस कदंब वाहतूक महामंडळ चालविण्यास घेणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. परंतु सरकारच्या या निर्णयाला खासगी बसमालक तयार नाहीत.

त्‍यांच्‍याशी कोणतीही चर्चा न करताच आपल्या मनानेच मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत, अशी टीका खासगी बसमालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी केली.

‘गोमन्तक’ने ताम्हणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्यात 1 हजार 460 खासगी बसेस आहेत. त्या बसेसची मालकी वेगवेगळ्या जणांकडे आहे. एवढ्या सर्वांना विश्‍वासात घेणे आवश्‍यक आहे. पण तसे करण्‍यात आलेला नाही.

Goa News | Sudip Tamhankar
Watch Video: ओल्ड गोवा चर्चसमोर महिला पर्यटकाचा फुल्ल राडा; शिवीगाळ, स्पर्श केल्याचा आरोप

टॅक्‍सीवाल्‍यांचा प्रश्‍‍न अधांतरीच असताना...

खासगी बसेस ज्या ठिकाणी जातात, तेथे कदंबच्या बसेस जात नाहीत. खासगी बसचालकांना काही प्रमाणात सवलतीही द्याव्या लागतात. त्यामुळे या बसेस आपल्या ताब्यात घेऊन त्या चालवाव्यात असा महामंडळाचा यापूर्वीपासून प्रयत्न आहे.

परंतु अगोदरच टॅक्सीवाल्यांचा प्रश्‍न सुटलेला नाही. असे असताना आता त्यात खासगी बसेस घेण्याविषयीच्या प्रश्‍नाची भर पडली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता वेगळे वळण घेण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे ताम्‍हणकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Electric Bus Proposal Cancelled
Sanjivani Sugar Factory
India Private Space Sector 2020 Reforms
Kadamba Bus Drivers Recruitment
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com