Watch Video: ओल्ड गोवा चर्चसमोर महिला पर्यटकाचा फुल्ल राडा; शिवीगाळ, स्पर्श केल्याचा आरोप

ओल्ड गोवा येथील बॅसिलिका ऑफ बोम जिझस चर्चला दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात.
Basilica of Bom Jesus
Basilica of Bom JesusDainik Gomantak

Basilica of Bom Jesus Church Old Goa: जुने गोवे (ओल्ड गोवा) येथील प्रसिद्ध बॅसिलिका ऑफ बोम जिझस चर्चसमोर सकाळी मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक या दिवशी चर्चला भेट देत असतात. दरम्यान, सकाळी महिला पर्यटक आणि चर्चचे सुरक्षा रक्षक यांच्या मोठा वाद झाला व महिला पर्यटक आक्रमक झाली.

रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक ओल्ड गोवा येथील बॅसिलिका ऑफ बोम जिझस चर्चला (Basilica of Bom Jesus) भेट देत असतात. सकाळी दहा वाजत चर्च पर्यटकांसाठी खुले केले जाते. सर्वांसाठी हाच नियम आहे. दरम्यान, सकाळी नऊच्या दरम्यान, संबधित पर्यटक चर्च समोर आले व आत जाण्याची परवानगी मगीतली. पण, चर्च दहा वाजता खुले होणार असल्याचे सांगितल्यानंतर महिला पर्यटक आणि चर्चचे सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला.

वाद फारच टोकाला पोहोचला, यात महिला पर्यटक सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करताना देखील दिसत आहे. तसेच, महिलेसोबत असणारा पुरूष देखील सुरक्षा रक्षकांसोबत वाद घालताना दिसत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी गोळा झाली होती.

Basilica of Bom Jesus
धक्कादायक! शिवोलीत गोमांसाठी दोन गाईंची कत्तल? परराज्यातील कामगारांचे कृत्य

ऑनलाईन वेळेमुळे होत आहे संभ्रम

ओल्ड गोवा (Old Goa) येथील बॅसिलिका ऑफ बोम जिझस चर्चला दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. इंटरनेटच्या काळात येणारे पर्यटक ठिकाणांचा वेळा ऑनलाईन तापासतात. पण, ऑनलाईनवर दोन वेगवेगळ्या वेळा दाखवल्या जात असल्याने अनेकांचा संभ्रम होत आहे.

Basilica of Bom Jesus
Basilica of Bom JesusGoogle Page Info

ऑनलाईन सर्च केले असता बॅसिलिका ऑफ बोम जिझस चर्च खुले होण्याची वेळ सकाळी 8 वाजता दाखवत आहे. तर, गोवा पर्यटन खात्याच्या संकेतस्थळावर चर्च खुले होण्याची वेळी रविवारी सकाळी 10.30 आणि इतर दिवशी सकाळी नऊ वाजता सुरू होते असे दाखविण्यात आले आहे. यामुळे चर्च नेमकं कधी सुरू होते याबाबत पर्यटकांमध्ये संभ्रम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com