Goa Traffic News : अवजड वाहनांना आता पणजीत दिवसा प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

कोंडीच्या ठिकाणी पोलिस तैनात
Goa Traffic News Heavy vehicles
Goa Traffic News Heavy vehicles Dainik Gomantak
Published on
Updated on

राजधानी पणजीत सोमवारी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात येणाऱ्या अवजड वाहनांवर 27 मार्चपर्यंत सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत प्रवेशबंदीचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केला. (Entry of Heavy Vehicles Now Banned in Panaji During The Day)

पणजीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस तैनात केले होते. राजधानीत जी-20 बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर रस्ता डांबरीकरणाची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे अधूनमधून वाहतूक कोंडी होते.

अटल सेतूवरील सुरू असलेले काम 27 मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. तोपर्यंत हा आदेश कायम राहणार आहे. आजही पणजी व पर्वरी वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात होती. मात्र, पोलिस तैनात केल्याने ती कालच्याप्रमाणे जाणवली नाही.

Goa Traffic News Heavy vehicles
Chhattisgarh Teachers In Goa: वैद्यकीय रजा अन् गोव्यात मजा! सरकारी शिक्षकांचे भलतेच काम आले समोर, दिले चौकशीचे आदेश

सावंतवाडी येथून गोव्यात येणारी वाहने बांदा येथेच थांबवली जाणार आहेत, तर बाणस्तारीकडून येणारी वाहने पुलावरूनच परत वळवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

पणजीतील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्यामुळे सर्वत्र वाहतूक काल ठप्प झाली होती. त्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिस अधीक्षक बॉस्युएट सिल्वा यांनी कालच उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पत्र पाठवून दिवसा अवजड वाहनांना पणजीत प्रवेश देऊ नये, अशी विनंती केली होती.

Goa Traffic News Heavy vehicles
Goa Police in Anjuna: उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर; हणजुणे परिसरात राबवली विशेष मोहिम

डागडुजीमुळे सलग दुसऱ्या दिवशी ‘सेतू’वर कोंडी कायम

अटल सेतूचे डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी आज हा पूल एकेरी बंद ठेवल्याने दुसऱ्याही दिवशी पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहनचालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.

अटल सेतूचे डागडुजीचे काम सोमवारपासून सुरू असून पर्वरीहून पणजीला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यातच भर म्हणून ओ कोकेरो सर्कलजवळ डांबरीकरण सुरू असल्याने वाहनचालकांना अनंत अडचणींना तोंड देत पणजीला जावे लागले. अटल सेतूवरील एकेरी वाहतूक बंद केल्याने, ती जुन्या पुलावरून वळवावी लागली.

वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने उशिरा पोहोचण्याच्या भीतीने वाहनचालकांनी वाहने बेशिस्तपणे चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांसह स्थानकातील पोलिसांनाही या कामासाठी जुंपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com