IFFI Goa 2024: इफ्फीतला एकमेव LGBTQ सिनेमा; काय आहे कथानक, दिग्दर्शकाने सांगितली Story Line

IGBTQ Movie at IFFI Goa: 'अम्मा'ज प्राईड नावाचा हा लघुपट तृतीयपंथी समाजाने विवाहाच्या कायदेशीर मान्यतेसाठी दिलेल्या लढ्यावर भाष्य करतो
Amma's Pride at IFFI Goa: अम्मास प्राईड नावाचा हा लघुपट तृतीयपंथी समाजाने विवाहाच्या कायदेशीर मान्यतेसाठी दिलेल्या लढ्यावर भाष्य करतो
Amma's Pride Screening at IFFI GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात सध्या चित्रपटांची भली मोठी रांग लागली आहे. केवळ देशामधूनच नाही तर विदेशातून देखील अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अनेक चित्रपट गोव्यात दाखवले जातायत आणि यांमध्ये इंडियन पॅनोरमामधून सादर करण्यात आलेल्या एकमेव LGBTQ सिनेमाची भरपूर चर्चा होतेय,चित्रपटप्रेमींना हा सिनेमा बराच रुचलेला दिसतोय. अम्माज प्राईड नावाचा हा लघुपट तृतीयपंथी समाजाने विवाहाच्या कायदेशीर मान्यतेसाठी दिलेल्या लढ्यावर भाष्य करतो.

या चित्रपटात श्रीजा नावाच्या पात्राची प्रमुख भूमिका आहे, आणि संपूर्ण सिनेमा प्रमुख पात्राच्या आयुष्याभोवती फिरतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवा क्रिश म्हणाले की तृतीयपंथी समुहासाबद्दल आपल्या मनात अजूनही किंतु-परंतु कायम आहेत, यामुळे समाजात त्यांना वावरणं कठीण जातंय.

Amma's Pride at IFFI Goa: अम्मास प्राईड नावाचा हा लघुपट तृतीयपंथी समाजाने विवाहाच्या कायदेशीर मान्यतेसाठी दिलेल्या लढ्यावर भाष्य करतो
Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

चित्रपटाच्या प्रमुख पात्राची आई म्हणजेच वल्ली अनेकांना भावली आहे. वडिलांशिवाय वाढलेल्या तिच्या मुलीला ती कोणत्याही बंधनात अडकवून ठेवत नाही. तिला कायम जगण्याची मोकळीक देते.

किमान या चित्रपटानंतर तरी लोकांचा दृष्टिकोन बदलेल अशी अशा दिग्दर्शकाने व्यक्त केली. तो म्हणाला की चित्रपट सादर करण्याआधी आम्ही तो अनेक LGBTQ समाजातील माणसांना दाखवला होता, चित्रपटात दाखवलेलं सकरात्मक रूप पाहून ते खुश झाले होते.

चित्रपटाचा दिग्दर्शक एक नवखा आहे तरीही त्याला या माध्यमातून समाजात बदल घडवायचे आहेत. या चित्रपटाला यंदा कॅनडातील आंतरराष्ट्रीय दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट LGBTQ+ चित्रपटासाठी शेर व्हँकुव्हर पुरस्कार मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com