National Games : स्वातंत्र्याच्या अमृतकाळात ऐतिहासिक क्रीडापर्व : मुख्यमंत्री डॉ. सावंत

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर ‘मोगा’चे अनावरण
launched the Mascot for the Upcoming 37th National Games
launched the Mascot for the Upcoming 37th National GamesDainik Gomantak
Published on
Updated on

‘गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कधी होणार याची 2008 पासून वाट पाहत आहोत, त्यास तप पूर्ण झाले. मात्र, आता देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतकाळ हीच योग्य वेळ आहे. या कालावधीत होणारी ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निश्चितच यशस्वी, भव्यदिव्य आणि ऐतिहासिक ठरेल’, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी व्यक्त केला.

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये शानदार समारंभात स्पर्धेचा शुभंकर ‘मोगा’चे (भारतीय गवा) अनावरण झाले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, ‘१८ जून हा गोव्यातील क्रांतिदिन.

आज राज्यातील क्रीडांगणावर क्रांती झाली आहे. ही स्पर्धा म्हणजे गोमंतकीयांसाठी मोठी संधी आहे, जी यापूर्वी मिळाली नव्हती. संघटना, खेळाडू, स्वयंसेवकांनी यजमान या नात्याने मोठ्या प्रमाणात सहभागासाठी प्रयत्नशील राहावे,’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली.

launched the Mascot for the Upcoming 37th National Games
FC Goa : एदू बेदिया एफसी गोवाच्या करारातून मुक्त; सहा मोसमांत 122 सामने

‘स्पर्धेचे ब्रीद ‘जुडेंगे, जियेंगे, जितेंगे’ आहे, त्याचप्रमाणे आम्हाला स्पर्धा यशस्वी ठरवायची आहे. स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना गोव्याला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यजमानपद मिळाले. त्या आयोजनात राज्याने उल्लेखनीय प्रगती साधली व गोवा ‘इफ्फी’चे नियमित केंद्र बनले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात प्रत्येकवेळी होऊ शकणार नाही, मात्र यावेळी आम्ही निश्चितच यजमान या नात्याने ठसा उमटवू शकतो’, असे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले.

स्पर्धा शुभंकराच्या अनावरण सोहळ्यास क्रीडामंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आयओए अध्यक्ष महान धावपटू पी. टी. उषा, राज्याचे मुख्यसचिव पुनीतकुमार गोयल, ऑलिंपिक पदकविजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम, क्रीडा सचिव स्वेतिका सचन, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर यांची उपस्थिती होती.

तारीख पे तारीख थांबणार

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात गोव्याने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) यापूर्वी कितीतरी तारखा दिल्या; परंतु त्यापैकी एकही पाळली गेली नाही.

अप्रत्यक्षपणे हा मुद्दा पकडून मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘तारीख पे तारीख आता थांबणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ निश्चित केल्यानंतर लवकरच ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनाची तारीख जाहीर केली जाईल. मोगा आयलो... आता भिवपाची गरज ना...!’

launched the Mascot for the Upcoming 37th National Games
FC Goa : एदू बेदिया एफसी गोवाच्या करारातून मुक्त; सहा मोसमांत 122 सामने

अखेर ‘मोगा’ अवतरला...

  • साऱ्यांना गेले कित्येक दिवस उत्सुकता असलेला ‘मोगा’ रविवारी संध्याकाळी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये अवतरला

  • ‘मोगा’ म्हणजे ‘भारतीय गवा,’ गोव्यात होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा अधिकृत शुभंकर

  • भारतीय गवा’ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात सापडतो

  • कोकणीत ‘मोग’ म्हणजे प्रेम, त्यावरून शुभंकराचे नामकरण ‘मोगा’ केल्याची क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची माहिती

  • ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गोव्यातील २८ ठिकाणी

  • गोव्यातील स्पर्धेत एकूण ४३ खेळ, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात ठरला विक्रम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com