ॲपवर आधारित टॅक्सी सेवेसाठी सर्वांनी समर्थन देणे गरजेचे - मंत्री रोहन खंवटे

सांस्कृतिक उत्सवांचे गोवन वार्षिक वेळापत्रक करणार
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

गेले काही दिवस गोवा राज्यात टॅक्सी मीटरवरुन राजकीय आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अनेक वेळा टॅक्सी सेवेसाठी जाणीवपूर्वक मीटरचा वापर केला जात नाही. असे निरीक्षण गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरु असलेल्या गोवा विधानसभा अधिवेशन नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आज स्पष्ट केले आहे की, ॲपवर आधारित टॅक्सी सेवेसाठी सर्वांनी समर्थन देणे गरजेचे आहे. ( Everyone needs to support app-based Goa taxi service - Minister Rohan Khante )

Rohan Khaunte
...तरच गोव्यात पोलिसांना वाहनं अडवता येणार!

गेल्या काही दिवसांपूर्वी टॅक्सी सेवा मीटरवरुन चालकांनी नकारात्मकता दर्शवली होती. मात्र गोवा सरकार याबाबत सकारात्मक आहे. या दोन्ही वेगवेगळ्या भूमिकांचा मार्ग चर्चेने निघणे शक्य आहे. त्यामूळे मंत्री खंवटे यांनी सर्वांनी चर्चेद्वारे एक भुमिका घेतल्यास यावर मार्ग निघणे शक्य आहे. असे ते यावेळी म्हणाले.

Rohan Khaunte
''मुरगाव-सासष्टीचा कचरा प्रश्‍न सुटणार''

सांस्कृतिक उत्सवांचे गोवन वार्षिक वेळापत्रक करणार

तसेच यावेळी बोलताना मंत्री खंवटे म्हणाले की, गोवा राज्याची सांस्कृतिक परंपरा, सण उत्सवांनी राज्याची देशात वेगळी ओळख आहे. गोवा राज्यातील सण ही वेगळे आहेत. त्यांचे नियोजण नेटके होणे आवश्यक आहे. त्यामूळे अशा सांस्कृतिक उत्सवांचे गोवन वार्षिक वेळापत्रक ही तयार केले जाईल असे ही ते यावेळी म्हणाले. जसे की, नुकताच झालेला चिखलकाला असेल अथवा त्यानंतर असणारा बोंदेरा उत्सव यांचा ही समावेश या वेळापत्रकात असेल असे ही ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काय घेतली होती भुमिका ?

गोवा राज्याच्या दीर्घकालीन पर्यटनासाठी ‘ॲप बेस टॅक्सीस’ सर्वोत्तम उपाय असून, त्याची अंमलबजावणी लवकरच करू, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील 9,457 टॅक्सींना मीटर बसविण्यात आले आहे. त्यापैकी मीटर भाड्यामध्ये सवलत मिळावी म्हणून 2268 टॅक्सी धारकांनी अर्ज केला आहे. त्यापैकी 1829 जणांना मीटरवरील अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

मात्र, हा प्रश्न सवलतीने सुटणारा नाही. कारण बसवलेले मीटर टॅक्सी धारकांकडून चालवले जात नाही, हा यंत्रणेतून स्पष्ट होत आहे. बसवलेले मीटर वापरले जात नाही म्हणून तब्बल 3683 जणांना दंड आकारण्यात आला आणि दंडाची आकारणी सरसकट केल्यास सर्वच टॅक्सी चालकांना तालाव द्यावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com