गोवा बॅडमिंटन संघटनेची निवडणूक ठरणार बिनविरोध; बॅडमिंटनपटू अनुष्का कुवेलकरला समितीत स्थान

Goa Badminton Association: राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत गोवा बॅडमिंटन संघटनेची नवी कार्यकारी समिती बिनविरोध ठरणार आहे.
Anushka Kuvelkar
Anushka KuvelkarDainik Gomantak

Goa Badminton Association: राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत गोवा बॅडमिंटन संघटनेची नवी कार्यकारी समिती बिनविरोध ठरणार आहे. सोळा सदस्यीय समितीत 12 नवे चेहरे असतील आणि संघटनेचे अध्यक्षपद मनोज पाटील यांच्याकडे राही

दरम्यान, गोवा बॅडमिंटन संघटनेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. 21 एप्रिल रोजी नवी समिती कार्यभार स्वीकारेल. भारताची माजी अव्वल क्रमांकाची महिला बॅडमिंटनपटू अनुष्का कुवेलकर हिलाही समितीत स्थान असेल. मनोज पाटील हे गोव्याचे माजी क्रिकेटपटू असून विविध बॅडमिंटन स्पर्धा आयोजनांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. बॅडमिंटन संघटना निवडणूक प्रक्रियेत गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. गोवा ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष जयेश नाईक निरीक्षक आहेत.

Anushka Kuvelkar
Indian Super League: स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या जमशेदपूर एफसीचा उद्या सामना; एफसी गोवाशी करणार दोन हात

असे असतील पदाधिकारी

अध्यक्षपदासाठी मनोज पाटील, सचिवपदासाठी प्रवीण शेणॉय, खजिनदारपदासाठी संजय भोबे, संयुक्त सचिवपदासाठी अनिकेत रेडकर, संयुक्त खजिनदारपदासाठी पराग चौहान, चार उपाध्यक्षपदासाठी संतोष जॉर्ज, हर्षद धोंड, वृषाली कार्दोझ, स्वप्नील नाचनोळकर, सात सदस्यपदासाठी अनुक्रमे निखिल प्रभू मोये, वेन फर्नांडिस, नावीद तहसिलदार, आर्नोल्ड रॉड्रिग्ज, डार्विन बार्रेटो, यशवंत देसाई, अनुष्का कुवेलकर यांचे उमेदवारी अर्ज आहेत. संजय भोबे, पराग चौहान, वेन फर्नांडिस व डार्विन बार्रेटो यांचा अपवाद वगळता इतर चेहरे संघटनेच्या प्रशासनात नवे असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com